संतोष देशमुखांच्या मुलीला बारावीच्या परीक्षेत मिळाले घवघवीत यश; वैभवी देशमुखला…
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांची लेक वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत ८५.१३ टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. वैभवीने आपल्या काकांसह खंबीरपणे उभे राहून वडिलांसाठी न्याय मागितला. आज महाराष्ट्रात बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ आहे.