scorecardresearch

आयसीसी

ICC म्हणजेच International cricket council ही क्रिकेट खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. या देशाद्वारे जगभरातील देशांमध्ये वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांकडून या वसाहतींमध्ये क्रिकेट खेळ पोहोचला. हळूहळू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जाऊ लागला. देशांतर्गत सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जावेत असे तेव्हाच्या दिग्गजांना वाटू लागले. पुढे याच भावनेने प्रेरीत होत १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तेव्हा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका देशांमध्ये ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले. १९६५ पर्यंत अनेक देशातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे सामने खेळू लागले होते. तेव्हा इंपेरियल क्रिकेट संघटनेचे नाव बदलून इंटरनॅशल क्रिकेट कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. १९८९ मध्ये या नावात पुन्हा बदल करण्यात आला आणि आयसीसी – इंटरनॅशल क्रिकेट काऊंसिल या नावाचा वापर करण्यात आला. आयसीसीद्वारे क्रिकेट संबंधित सर्व कार्यक्रमांचे, सामन्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश होतो. सध्या आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या संघटनेमध्ये १०० पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. १९२६ मध्ये भारताला आयसीसीचे सदसत्व मिळाले होते.Read More
bangladesh
SL vs BAN: वनडे क्रिकेटमध्ये १४ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं! श्रीलंका- बांगलादेश सामना ‘या’ कारणामुळे ठरला ऐतिहासिक

New Ball Rule By ICC: श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात आयसीसीचा नवीन नियम पहिल्यांदाच लागू करणयात…

brian bennett
ZIM vs SA: डोक्याला बॉल लागला अन् सामन्यातून बाहेर पडावं लागलं; ICC च्या ‘या’ नियमाचा झिम्बाब्वेला फटका

Brian Bennett Injury: झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. या…

cricket reforms icc introduces week of rest after concussion and wide ball new rules changes
कन्कशननंतर आठवडाभर विश्रांती; आणखीही नियमांत ‘आयसीसी’कडून बदल

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तिन्ही प्रारूपांसाठी आणखी काही नियमांत बदल केले असून ‘कन्कशन’नंतर (डोक्याला चेंडू लागणे) आता खेळाडूला सात दिवस…

ICC Rule Change: What Are 8 Rules Which ICC Changes in International Cricket in Across 3 Formats
ICC’s Big Rule Changes: ICCचे क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये मोठे बदल; कसोटीत स्टॉप क्लॉक, ५ धावांचा दंड, सीमारेषेवरील झेल… वाचा सविस्तर

Cricket Rule Change: आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. कसोटी क्रिकेटसह दोन्ही क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये नियमांमध्ये बदल केले आहेत.

Rishabh Pant
दोन शतकांमुळे जगाने वाखाणलं, पण मैदानातील ‘त्या’ कृतीमुळे ICC ने फटकारलं; ऋषभ पंतचं नेमकं काय चुकलं?

Rishabh Pant Breach ICC Code of Conduct : एका बाजूला कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावून संपूर्ण जगाचं लक्ष वेधून…

shubman gill
IND vs ENG: गिलला एक छोटीशी चूक महागात पडणार; ICC कारवाई करणार? नेमकं कारण काय?

Shubman Gill Wearing Black Socks: भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने एक छोटी चूक केली जी त्याला…

anaya bangar
Anaya Bangar: “मी महिला क्रिकेट खेळण्यास पात्र..”, अनाया बांगरची ICC अन् BCCI कडे खास मागणी

Anaya Bangar Demand From BCCI And ICC: अनाया बांगरने आयसीसी आणि बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे. तिने, महिला क्रिकेट खेळण्यासाठी…

ind vs pak
ICC कडून टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! भारत- पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

ICC Womens T20 World Cup 2026: आयसीसीकडून महिलांच्या टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक…

ICC plans 4 day Tests in Next WTC cycle India Australia and England to play 5 day matches
WTC: ५ नाही ४ दिवसांचा होणार कसोटी सामना, ICC चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी खास प्लॅन; नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत

World Test Championship: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या चक्रामध्ये आयसीसी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

Smriti Mandhana becomes world No 1 Batter for the first time in six years in ICC ODI Rankings
ICC ODI Rankings: स्मृती मानधना ठरली वर्ल्ड नंबर वन! वनडे क्रिकेटमध्ये ६ वर्षांनी परत मिळवला ताज

Smriti Mandhana ICC ODI Rankings: स्मृती मानधना २०१९ नंतर पुन्हा वर्ल्ड नंबर वन फलंदाज ठरली आहे. महिला क्रिकेटमधील वनडे फॉरमॅटची…

WTC 2025 27 Full Schedule Who Will India Face in New WTC Cycle Total 71 Test Matches to Ne Played in 2 Years
WTC 2025-27 Schedule: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ चे वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया कधी आणि कोणाविरुद्ध खेळणार सामने? जाणून घ्या

WTC 2025-27 Schedule: आयसीसीने २०२५-२७ या जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये नऊ संघांमध्ये ७१ सामने खेळले…

संबंधित बातम्या