स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकापैकी एक बॅंक आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये भारताचे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्हीही प्रांतांमध्ये ब्रिटीशांद्वारे ‘बॅंक ऑफ बंगाल’, ‘बॅंक ऑफ मद्रास’ आणि ‘बॅंक ऑफ बॉम्बे’ या बॅंकांची स्थापना करण्यात आली होती. पुढे १९२१ मध्ये या तिन्ही बॅंकांचे एकीकरण करुन ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुलै १९५५ मध्ये ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ ठेवले गेले. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास ही बॅंक जगातली सर्वात मोठी बॅंक ठरु शकते. या बॅंकेचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फ ग्राहकांना नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. इतर देशांमध्येही या बॅंकेचे जाळे पसरले आहे. Read More
बँकिंग क्षेत्रातील पहिल्या व एकमेव अशा ‘सायबर सिक्युरिटी ऑपरेशन’ (सी-सॉक) केंद्राचे उद्घाटन नुकतेच राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.
गेल्या तीन वर्षांत भारताच्या कुटुंबावरील कर्जे वाढत असताना, स्टेट बँकेच्या संशोधनपर अहवालाने विशेषतः अर्थव्यवस्थेच्या वाढीची स्थिती आणि कर्जाच्या प्रकाराचा विचार…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खास क्रेडिट कार्ड योजनेची माहिती दिसल्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने मोबाइलमध्ये ती जाहिरात उघडली. त्यातील अर्जामध्ये आवश्यक सर्व…