scorecardresearch

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
Satara eknath shinde criticizes opposition Lost Public Trust misinformation Koyna Backwater Festival
“जनतेने तुम्हाला उचलून फेकले!” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर कडवट टीका

Eknath Shinde : विरोधक पराभवाने पछाडले असून लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात घणाघात केला.

cm Fadnavis Slams Opposition Immature Voter List Fiasco Sharad Pawar Avoid Meeting Election Atmosphere
गोंधळलेल्या विरोधकांमुळेच शरद पवारांनीही टाळले; निवडणूक कार्यालयातील चकरांचा ‘फियास्को’ – देवेंद्र फडणवीस

राजकारणात आजपर्यंत एवढे गोंधळलेले विरोधक कधीही पाहिले नाहीत, त्यांच्या चकरा म्हणजे केवळ ‘फियास्को’ असल्याचे टीकात्मक मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Maharashta Politics : “घोळ सुधारत नाही तोवर निवडणूक घेऊ नका” ते “इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत”; वाचा दिवसभरातील ५ टॉप विधाने!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हलचालींना चांगलाच वेग आला आहे.

Devendra-Fadnavis News
देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत, कायदा काय सांगतो..”

विरोधकांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं आहे.

Uddhav-thackeray-jayant-patil-balasaheb-thorat
“…तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा”, उद्धव ठाकरेंचा भर बैठकीत निवडणूक आयुक्तांना टोला; म्हणाले, “कठपुतळी बाहुल्या…”

Uddhav Thackeray on Election Commission : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला…

devendra fadnavis
Maharashtra News : “कुणीही एकत्र येऊ द्या, महापालिका निवडणुकीत महायुतीच जिंकणार”, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Mumbai News Today: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…

Uddhav Thackeray to Inaugurate MNS Deepotsav at Shivaji Park Raj  Thackeray brothers unity
MNS Deepotsav: मनसेच्या दीपोत्सवाचे यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

 Thackeray Brothers Unity : दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले असून यंदा या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख…

Raj and Uddhav Thackeray
राज ठाकरेंच्या दीपोत्सवला उद्धव ठाकरे उद्घाटक; ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र

मनसेचा जो दीपोत्सव दरवर्षी दिवाळीत असतो. या वेळी या दीपोत्सवाचे उद्घाटक उद्धव ठाकरे असणार आहेत. मनसेने पोस्ट करत ही माहिती…

Shiv Sena voter list complaint
नाशिकमध्ये साडेतीन लाखहून अधिक मयत, दुबार,बनावट मतदार ? शिवसेना ठाकरे गटाच्या तक्रारीचे काय होणार…

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दुबार नावे असतील तर संबंधिताकडून दोनपैकी कुठे मतदान करणार याची नोंद घ्यावी लागते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून…

Raj-Thackeray-uddhav-thackeray-aditya-thackeray
“ती यादी लपवण्यात छुपा राजकीय हेतू?” मविआ व मनसेचे निवडणूक आयोगाला सहा प्रश्न, निवेदनात काय म्हटलंय? फ्रीमियम स्टोरी

Mahavikas Aghadi MNS Delegation : मविआ व मनसेच्या संयुक्त शिष्टमंडळात मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Shiv Sena-MNS Alliance : मुंबईतील २२७ पैकी ‘इतक्या’ प्रभागांमध्ये मनसेचा दरारा; ठाकरे बंधूंची युती झाल्यास कुणाला फटका? प्रीमियम स्टोरी

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : १९९७ मध्ये एकसंध शिवसेनेने भाजपाबरोबर युती करून पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकावला…

संबंधित बातम्या