सध्या सोशल मीडियावर संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याची जोरदार चर्चा आहे. इन्स्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉट्सवर हे गाणं लोकप्रिय ठरलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ विजेता सूरज चव्हाणनेही या गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूरजने आपल्या नवीन बाइकसह हा व्हिडीओ शेअर केला असून चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.