डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
जुन्या राजवटीच्या मुळावर घाव घालत स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय सारख्या मूल्यांचा प्रसार करणाऱ्या व्होल्तेरनं ‘लर्नेड’ आणि ‘इंटलेक्च्युअल’मधला फरक कृतीतून स्पष्ट…
जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही, हा मूलमंत्रच त्यांनी आपल्या अनुयायांना दिला. बाबासाहेबाबाच्या विचारांनी भारावलेल्या त्यांच्या अनुयायांना हा…