राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची जन्मभूमी असलेले गुजरात (Gujarat) हे राज्य व्यापारासाठी फार प्रसिद्ध आहे. इतिहासकारांनुसार, भारतातील सर्वात पहिले बंदर लोथल गुजरातमध्ये होते. गुजरात आणि राजस्थान यांची सीमा जवळ असल्याने आणि गुजरातला समुद्रकिनारपट्टी लाभल्यामुळे तेथे व्यापारासाठी पूरक परिस्थिती फार पूर्वीपासून होती. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे. हे राज्य सर्व विभागांमध्ये प्रगती करत आहे. गुजरातमध्ये २६ जिल्हे आहेत. गांधीनगर ही गुजरातची राजधानी असली, तरी सुरत आणि अहमदाबाद या शहरांविषयीचे आकर्षणही लोकांमध्ये पाहायला मिळते.
सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता या राज्यामध्ये आहे. या पक्षाचे भूपेंद्र पटेल गुजराते मुख्यमंत्री आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. या राज्याचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषिवले आहे. गुजरात दांडिया, गरबा – जलेबी फाफडा अशा गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. Read More
BJP Leader Life Sentence : व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी न्यायालयाने भाजपाच्या माजी आमदारासह १४ जणांना जन्मठेपाची शिक्षा सुनावली…
सर्वोच्च न्यायालयाने गुजरातच्या जामनगर येथे रिलायन्स फाउंडेशनकडून चालविल्या जाणाऱ्या वनतारा प्रकल्पाची विशेष तपास पथकातर्फे (SIT) चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत.