Chennai Super Kings (चेन्नई सुपर किंग्ज)

संघाचे पूर्ण नाव : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings ) संघाचे निक नाव : सीएसके (CSK) संघाची स्थापना : २००८ ग्राउंड : एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई संघाचे मालक : एन. श्रीनिवासन (इंडिया सिमेंट्स) आयपीएल २०२३ हा चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या संघाचा प्रत्येक चाहता हा एमएस धोनी (MS Dhoni) याचा देखील तितकाच मोठा चाहता आहे. पहिल्या हंगामापाासून धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्त्व करत आहे. त्याने सीएसकेला चार आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. आयपीएलचा सोळावा हंगाम हा धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. याच कारणामुळे चाहते चेन्नईचा प्रत्येक सामना पाहत आहेत. स्वत: धोनी देखील चाहत्यांच्या अपेक्षा खऱ्या करताना दिसत आहे. आयपीएल २०२३ मध्ये झालेल्या एकूण सामन्यांमध्ये धोनीने तुफान फटकेबाजी करत लोकांचे मनोरंजन केले आहे. माहीला विकेटच्या पाठून क्षेत्ररक्षण करताना पाहण्यासाठी चाहते स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे पाहायला मिळते. ड्वेन ब्राव्होने निर्वत्ती घेतल्यानंतर चेन्नईच्या संघाला डेथ ओव्हर्स स्पेशालिस्टची गरज होती. ब्राव्होची कमी बेन स्टोक्स भरुन काढेल या आशेने सीएसकेने स्टोक्सवर बोली लावली. पण स्टोक्सला अजूनही सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळते. त्यातही दुखापत झाल्याने तो आयपीएलमध्ये पुढे खेळेल की नाही याबाबत शंका आहे. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामी जोडी सीएसकेच्या खेळीची चांगली सुरुवात करते. अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायडू या मध्यक्रमातील फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत. दीपक चहर, तुषार देशपांडे, आकाश सिंग, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर हे गोलंदाजीची जबाबदारी सांभाळत आहेत. चेन्नई संघातील रवींद्र जडेजा आणि मोईन अली हे ऑल राउंडर्स चांगला खेळ दाखवत आहेत. त्यांनी फलंदाजी-गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये सरस ठरत आहेत. सीएसकेला त्यांच्या क्षेत्ररक्षणावर मेहनत घेण्याची गरज आहे. पॉइंट्स टेबलवरील पहिल्या पाच संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्जमध्ये नवीन काय आहे? नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये संघातील कोणते खेळाडू दिसतील? 2023 मध्ये CSK कोणते खेळाडू कायम ठेवेल? CSK 2024 मध्ये परत येईल का? CSK 2024 चा पुढचा कर्णधार कोण आहे?

Chennai Super Kings (चेन्नई सुपर किंग्ज) Stats

9
Match Played
2
Matches Won
7
Matches Lost
0
Matches Tie

Chennai Super Kings (चेन्नई सुपर किंग्ज) Fixtures

CSK vs PBKS
MA Chidambaram Stadium, Chennai
19:30 (IST) Apr 30,2025
RCB vs CSK
M.Chinnaswamy Stadium, Bengaluru
19:30 (IST) May 03,2025
KKR vs CSK
Eden Gardens, Kolkata
19:30 (IST) May 07,2025
CSK vs RR
MA Chidambaram Stadium, Chennai
19:30 (IST) May 12,2025
GT vs CSK
Narendra Modi Stadium, Ahmedabad
15:30 (IST) May 18,2025

Chennai Super Kings (चेन्नई सुपर किंग्ज) Squad