Mumbai Breaking News Updates: जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईमध्ये करोना रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली होती. परंतु, मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे पुणे – नगर रस्त्यावरील केसनंद परिसरात भरधाव ट्रकने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ट्रकचालकाकडे परवाना नसल्याचे उघडकीस आले असून, चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील महत्त्वाच्या शहरातील घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून मिळेल…
Live Updates
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 20 may 2025
मुंबई दौऱ्यात शिष्टाचार न पाळण्याचे प्रकरण, मुद्दा आणखी न वाढवण्याचे सरन्यायाधीशांचे आवाहन; तर संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी वकील संघटनेचा ठराव
तथापि, सर्व संबंधितांनी याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. …अधिक वाचा
ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा आणि उन्नत रस्ता प्रकल्प, १५ हजार कोटीच्या प्रकल्पाचे कंत्राट मेघा इंजिनियरींगला
त्यामुळे आता हा प्रकल्प मेघा इंजिनियरींगच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे. …अधिक वाचा
दहावीच्या गुणपत्रिका सोमवारी मिळणार, दुपारी ३ वाजल्यानंतर शाळेत वितरण
याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचना देण्यात आल्या असून, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे. …सविस्तर बातमी
अनैसर्गिक अत्याचारामुळे वृध्दाचा मृत्यू
पोलिसांनी हलगर्जीपणा केल्यामुळे उपचाराला विलंब होऊन मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. …वाचा सविस्तर
देवनारच्या जमिनीवर महानगर गॅसच्यावतीने बायो गॅस प्रकल्प, रोज १००० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने महानगरगॅस कंपनीला देण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. …अधिक वाचा
केरळमध्ये पुढील चार पाच दिवसांत नैऋत्य मोसमी वारे दाखल होणार
नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. …वाचा सविस्तर
मुंबईसह, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. …सविस्तर बातमी
ऑपरेशन सिंदूरनंतर समाजमाध्यमावरून देशविरोधी संदेश, महाविद्यालयातून काढून टाकण्याच्या कारवाईविरोधात विद्यार्थिनी उच्च न्यायालयात
तसेच, महाविद्यालयाने तिच्यावर केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. …सविस्तर बातमी
महापालिकेबाबत तक्रारी वाढल्या! तक्रारींमध्ये ७० टक्के वाढ; प्रदूषण, शौचालय, घनकचरा संबंधी तक्रारीत ३०० टक्क्यांनी वाढ
प्रजा फाऊंडेशन या संस्थेने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नागरी सुविधांची सद्यस्थिती या विषयावरील अहवाल तयार केला आहे. …सविस्तर बातमी
पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, १६ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार
अंतिम गुणवत्ता यादी २३ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. …वाचा सविस्तर
स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान आता ठाण्यातच शक्य!
त्यामुळे आता स्तनाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही. …सविस्तर बातमी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन…, ३०० किमी व्हायाडक्टचे काम पूर्ण
हे काम प्रगतीपथावर असून नुकताच सुरत येथे ४० मीटर लांबीचे फूल-स्पॅन बॉक्स गर्डरची उभारणी करण्यात आली. तर, ३०० किमी व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले. …वाचा सविस्तर
बहिणीशी फोनवर संभाषण, युवकासह मित्राला मारहाण… डांबून ठेवत थेट गळ्याला तलवार…
एवढेच नव्हे तर दोघांच्या गळ्याला तलवार लावत ठार मारण्याची धमकी दिली. तिथून सुटका झाल्यावर युवकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. …वाचा सविस्तर
कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू; सहा जण जखमी, मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश
चिकणीपाडा येथील श्री सप्तश्रृंगी इमारतीचे बांधकाम सन २००६ मध्ये करण्यात आले आहे. ही इमारत चार मजल्याची आहे. …सविस्तर वाचा
दोन वाघाच्या झुंजीत वाघाच्या पिल्लाचा मृत्यू
शवविच्छेदन नुसार प्राथमिक अंदाज -सदर वाघाच्या मादी पिल्लाचा मृत्यू दोन वाघाच्या झुंझीत अति रक्तस्राव मुळे झाला आहे. …सविस्तर बातमी
न्यायालयात शपथपत्र दाखल करताना आता घ्यावी लागणार दक्षता!
शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यास विलंब होत असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिकेवर सुनावणीदरम्यान गेल्या २६ मार्चला तीव्र नाराजी व्यक्त केली होती …सविस्तर वाचा
एका प्रकरणात न्या. गवई म्हणाले.”मला राजकीय पार्श्वभूमी सुनावणी घेऊ की नको? ”
माझे वडील काँग्रेसचे सदस्य नव्हते, पण त्यांचा काँग्रेसशी खूप जवळचे संबंध होते. त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंध ठेवला आहे. …वाचा सविस्तर
‘करवा चौथ’ सर्व महिलांसाठी बंधनकारक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका …
उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्व महिलांमध्ये विधवा महिला, घटस्फोट घेणाऱ्या महिला तसेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांचा समावेशही करण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
शासनलेखी राज्यात ३६ जिल्हे, मात्र भाजप म्हणतो ८० जिल्हे, नव्याने दोन जिल्ह्याची भर ?
भाजपने संघटनात्मक स्तरावर राज्यात ८० जिल्ह्यांची मांडणी केली असून त्यापैकी ५८ जिल्ह्यांचे अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर शहर/ग्रामीण व गडचिरोली जिल्ह्यात अध्यक्षांची घोषणा बाकी आहे.
…सविस्तर वाचा
जहाल माओवादी देवसूचे आत्मसमर्पण, मिलिंद तेलतुंबडेचा होता अंगरक्षक
मिलिंद तेलतुंबडे याचा माजी अंगरक्षक असलेला ३.५ लाखांच्या बक्षीसाचा जहाल माओवादी देवसू उर्फ देवा (२४) याने गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. …सविस्तर बातमी
समाजाच्या उत्थानासाठी वेळ देणे हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ
समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी वेळ देणे हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांनी व्यक्त केले. …वाचा सविस्तर
दहावीनंतर अकरावी, ‘जेईई’, ‘नीट’ करायचयं? मग करिअर कॉन्सलर डॉ. तेलंग यांचा सल्ला जाणून घ्या…
पालकांनी शिकवणी वर्गांच्या मायाजाळात अडकून जेईई, नीटच्या मागे न धावता अन्य पर्यायांचाही शोध घ्यावा, असा सल्ला करिअर समुपदेशक प्रा. पाणिनी तेलंग यांनी दिला. …सविस्तर बातमी
आग्रीपाड्यात जमिनीच्या वादातून सशस्त्र हल्ला, ४१ जणांना अटक
मुंबईतील आग्रीपाडा येथे मनी मॅग्नस या कंपनीच्या मालकी जागेवरून वाद आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. …सविस्तर बातमी
दहिसरमध्ये दोन गटात वाद, हल्ल्यात तिघांचा मृत्यू
एमएचबी पोलीस ठाणे याप्रकरणाचा तपास करीत आहे. आरोपी जखमी असल्याने अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याचे एमएचबी पोलिसांनी सांगितले. …वाचा सविस्तर
डॉ. जयंत नारळीकरांनी केला निधी परत
पुण्यात २०१० मध्ये झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाऊंडेशनने ८३ लक्ष रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपूर्द केला. त्याच्या व्याजातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लाख रुपयांचा निधी ग्रामीण आणि दुर्गम भागातील विविध वाङ्मयीन उपक्रमांसाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आला होता. …सविस्तर बातमी
पूर्व द्रुतगती मार्गावर दोन वाहनांची धडक, वाहतूक वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण
दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध उलटी झाल्याने मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. …वाचा सविस्तर
पुण्यातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर भीक मागो आंदोलन
वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पर्वती मतदार संघात सीसीटीव्ही बसवावेत, या मागणीसाठी शरद पवार गटाचे पदाधिकारी अमोल परदेशी यांनी अंगाला चिखल लावून, खुर्ची खांद्यावर घेत भीक मागो आंदोलन केले.
…सविस्तर वाचा
मुंबई : मोटरसायकलच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
याप्रकरणी मोटरसायकलस्वाराला माहीम पोलिसांनी अटक केली असून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. …सविस्तर वाचा
सहा महिने लोटूनही उसाचे चुकारे मिळाले नाही; आक्रमक शेतकऱ्यांनी मानस इंडस्ट्रीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप
सहा महिने लोटूनही उसाचे पैसे न मिळाल्यामुळे साकोली झोनमधील शेकडो शेतकरी आक्रमक झाले असून मानस ऍग्रो इंडस्ट्रीच्या कार्यालयावर कुलूप ठोकले. पंधरा दिवसांत चुकारे न मिळाल्यास २७ मे रोजी कारखान्यावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
…सविस्तर बातमी
मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे