scorecardresearch

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Kolhapur ShivSena Eknath Shinde Slams Rahul Gandhi Vote Theft Targets Uddhav Thackeray
नोट चोरीवर बोलणाऱ्यांना व्होट चोरीवर बोलण्याचा अधिकार काय? गटप्रमुख मेळाव्यात एकनाथ शिंदे आक्रमक!

Eknath Shinde, Rahul Gandhi, Uddhav Thackeray : अनेक वर्षे नोट चोरी करणाऱ्यांना व्होट चोरीवर बोलण्याचा काय अधिकार, असा सवाल उपमुख्यमंत्री…

Sanjay Jagtap BJP Entry Changes Jejuri Municipal Council Election Equation Dilip Barbhai pune
माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशाने समीकरणांमध्ये बदल…

Jejuri Municipal Council : काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जेजुरी नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे आणि वर्चस्वाची चर्चा…

Maharashtra municipal elections 2025 political battle between BJP, Congress, Shiv Sena, and NCP
Maharashtra Municipal Elections 2025 : सविस्तर : मिनी विधानसभा निवडणुकीत महायुतीची कसोटी; मविआचीही परीक्षा

Maharashtra Local Body Elections 2025 : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पार पाडत आहेत.

Eknath Shinde Kolhapur Visit ShivSena Gat Pramukh Melava Rajesh Kshirsagar Local Body Elections
शिवसेनेचा गट मेळावा; एकनाथ शिंदे यांची उपस्थिती…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) आयोजित गटप्रमुख मेळाव्यास…

Shinde Sena Saree Distribution shivsena ubt Burns Protest Hingoli Controversy
हिंगोलीत शिंदे गटाकडून साड्यांचे वाटप; उद्धव गटाकडून साड्यांची होळी…

हिंगोलीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाकडून ‘भाऊबीज’ निमित्ताने महिलांना साड्या वाटप सुरू होताच, उद्धव ठाकरे गटाने या साड्यांची होळी करून…

minister gulabrao Patil
“जळगावमध्ये शिंदे गटाची नाही तर भाजपची कोंडी…”, गुलाबराव पाटील असे का म्हणाले ?

महापालिका काबीज करण्यासाठी शिंदे गटासह अजित पवार गटाची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी…

zp election jalgaon pratap patil candidature issue gulabrao son reservation twist political reshuffle
Zp Election : “प्रताप पाटील दुसरीकडे निवडणूक…”, गुलाबराव पाटलांकडून मुलाच्या उमेदवारीविषयी स्पष्ट भूमिका…

Gulabrao Patil : आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असून गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये नव्या रणनीतीची चर्चा रंगली आहे.

Anmol Mhatre's post on social media hints new political journey
डोंबिवलीत वामन म्हात्रे यांच्या मुलाची राजकारणात वेगळी चूल? राजकारणातील नवीन अध्यायाला सुरूवात करण्याचे दिले संकेत

डोंबिवलीत अनमोल म्हात्रे यांनी राजकारणात वेगळी वाट चोखाळण्याचे संकेत दिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

girish mahajan
भाजप-शिवसेना शिंदे गटातील वाद…संकटमोचक गिरीश महाजन यांची नंदुरबारला धाव

भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यातल्या महायुतीतीमधील तिढा सुटणार की नाही याकडे साऱ्यांच्या…

BJP girish mahajan slammed shinde faction MLAs over claims of no development funds distribution
… मग विरोधी पक्षांना निधी दिला का ? गिरीश महाजन यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांना फटकारले…

पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी वर्षभरात आमदारांना विकास कामांसाठी निधीच गेला नसल्याचे म्हटले होते.निधी वाटपावरून होणाऱ्या आरोपांवरून भाजपचे…

errors voter lists nashik West Assembly Constituency Ward No 24
प्रभाग २४ मधील मतदार यादीत अनेक त्रुटी, शिंदे गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २४ मधील गोविंदनगर, जुने सिडको, तिडकेनगर, खांडे मळा परिसरातील मतदार याद्यांमध्ये अनेक त्रुटी शिवसेनेचे…

Prakash Surve
“मराठी माझी आई, मेली तरी चालेल” म्हणणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराची माफी; म्हणाले, “माझ्याकडून…”

MLA Prakash Surve apologize : “मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र…

संबंधित बातम्या