केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली. इराण, इराक, इस्रायल, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जागतिक संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धाचे तंत्र बदलले असून मिसाईल्स आणि ड्रोन्सचा वापर वाढला आहे. मानवतेचे रक्षण कठीण होत आहे. भारताने आंतरराष्ट्रीय घटनांचा आढावा घेऊन भविष्यातील धोरण ठरवण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.