-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
-
शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांची लोकप्रियता सलत असल्यामुळे त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी केला.
-
तसेच त्यांना मातोश्रीने पद सोडायला सांगितले होते, असेही शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत खोटारड्यांना मी उत्तर देत नाही, असा टोला लगावला होता. यानंतर पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे प्रत्युत्तर देताना म्हणाले, “एकनाथ शिंदे म्हणून २२ वर्ष शिवसेनेत होते. सर्व पदे त्यांनी भोगले आहेत. मी खोटारड्यांना उत्तर देत नाही. त्यांनी जी पदे घ्यायची होती, ती सर्व पदे अगदी मंत्रिपदापर्यंत सर्व पदे घेतली. त्यामुळे अशा व्यक्तींना आम्ही उत्तर द्यायचं का?” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला.
-
“माझ्याकडे अजून बरंच काही आहे. मी जर बोललो जर ते पळून जातील”, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
-
मुख्यमंत्री शिंदेंनी काय आरोप केले होते?
“आनंद दिघे यांच्याकडून जिल्हाप्रमुख पद काढून टाकण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. तसेच आनंद दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला विचारला होता.” -
“आनंद दिघे यांची लोकप्रियता वाढली होती. पण त्यानंतर त्यांना राजीनामा द्या असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ठाण्यासह अजून काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पुढे राजीनामा घेतला नाही. पण आनंद दिघे यांची लोकप्रियता त्यांना सलत असल्याने त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान होते”, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता.
-
दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे.
-
या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या संभांचा धडाका सुरु असून राजकारण तापले आहे. (सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरुन साभार.)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर