-  
  बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी त्याच्या सुपरहिट सिंघम या चित्रपटाचा आणखी एक सिक्वल घेऊन येत आहे.
 -  
  अतिशय रोमांचकारी कथानक आणि तगडी स्टारकास्ट या चित्रपटांमध्ये दिसत आहे.
 -  
  अजय देवगण, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ यांच्यासमवेत बाजीराव सिंघम ही भूमिका अजय देवगण पुन्हा एकदा साकारणार आहे.
 -  
  या चित्रपटांची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये मागील अनेक वर्षांपासून आहे.
 -  
  ३५० कोटी रुपये इतकं बजेट असलेल्या या चित्रपटात करीना कपूर, अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांच्याही भूमिका आहेत.
 -  
  तसेच या चित्रपटामध्ये सलमान खानसुद्धा कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे.
 -  
  परंतु ट्रेलर मध्ये तरी सलमान खान दिसलेला नाहीये.
 -  
  दरम्यान आज रिलीज झालेल्या ट्रेलरमधून हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी प्रेक्षकांना थेटरमध्ये अनुभवता येणार आहे.
 -  
  या चित्रपटाचा जवळपास पाच मिनिटांचा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज झाला आहे.
 -  
  या चित्रपटामध्ये तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे.
 -  
  दरम्यान या चित्रपटातील अभिनयासाठी कोणी किती मानधन घेतले आहे,? त्याबद्दल आपण जाणून घेऊ
 -  
  अभिनेता अजय देवगण या चित्रपटात पुन्हा एकदा बाजीराव सिंघम हे पात्र साकारणार आहे.
 -  
  अभिनेत्याने मुख्य भूमिकेसाठी ३५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
 -  
  तसेच तो या चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे.
 -  
  सिंघम रिटर्न्स या चित्रपटात करीना कपूरने अजय देवगणच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.
 -  
  सिंघम अगेनमध्ये करीनाने १० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
 -  
  दिग्दर्शक रोहित शेट्टी लेडी सिंघम हा चित्रपटही बनवणार आहे.
 -  
  हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला मिळाला आहे.
 -  
  सिंघम अगेनमध्ये लेडी सिंघमही दिसत आहे.
 -  
  तिने या भूमिकेसाठी ६ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
 -  
  तर अभिनेता टायगर श्रॉफ याने ३ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
 -  
  तर टायगरचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी या चित्रपटातील खलनायक म्हणून २ दोन कोटी रुपये मानधन घेतले आहे.
 -  
  चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असलेला अभिनेता अर्जुन कपूर याला ६ कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती आहे.
 -  
  त्याचबरोबर अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांच्या मानधनाबद्दल जाणून घेऊ
 -  
  रणवीर सिंहने २० कोटी तर अक्षय कुमारने १० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
 -  
  ही माहिती डिएनएने दिली आहे.
 -  
  (सर्व फोटो देवगण फिल्म्स यूट्युब चॅनलवरुन साभार)
 
  ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक