-
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे आजार नेहमी सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा विषय आहे, अभिनेता सलमान खानने नुकताच खुलासा केला आहे की तो एका आजाराने ग्रस्त आहे, असं असताना देखील तो सक्रियपणे काम करक राहतो. सलमान आणि इतर अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊ जे आजारांचा सामना करत आहेत…
-
सलमान खान
सलमान खानला ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया, ब्रेन अॅन्यूरिज्म (Brain Aneurysm) आणि एवी मालफॉर्मेशन हे आजार आहेत. याबद्दल त्याने स्वत:च खुलासा केला आहे. हा असा आजार आहे ज्यात व्यक्तीच्या चेहऱ्याच्या अनेक भागांमध्ये (डोकं, जबडा इत्यादी) प्रचंड वेदना होतात. -
ह्रतिक रोशन
ह्रतिकला ‘क्रोनिक सबड्युरल
हेमेटोमा ‘ नावाचा आजार होता. या स्थितीत,
मेंदूभोवती असलेल्या नसांमधून रक्त हळूहळू बाहेर पडते आणि एक गुठळी तयार होते. या स्थितीला ‘क्रॉनिक’ असे म्हणतात कारण ती पहिल्यांदा रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनी दिसून येते. क्रिश ३ च्या रिलीजपूर्वी त्याचे ऑपरेशन झाले होते. -
वरुण धवन
वरुण धवनला व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) नावाचा आजार आहे. या आजारात, व्यक्तीला शरीराचा तोल जाण्याची समस्या येते, कारण कानामधील संतुलन राखणाऱ्या भागातून मेंदूला योग्य संदेश मिळत नाहीत. -
विजय वर्मा
विजय वर्माला त्वचारोग (Vitiligo) नावाचा आजार आहे. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये त्वचेवर पांढरे डाग येतात, कारण त्वचेतील रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी नष्ट होतात. -
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्माला बल्जिंग डिस्क (bulging disc) किंवा स्लिप डिस्क (slip disc) चा त्रास आहे. ही एक पाठीच्या कणाशी संबंधित समस्या आहे ज्यामध्ये डिस्कच्या बाहेरचा भाग फुगतो किंवा सरकतो. -
रणबीर कपूर
रणबीर कपूरला डेविएटेड नेसल सेप्टम (Deviated Nasal Septum) नावाचा आजार आहे. या आजारात, नाकाचे हाड आणि कूर्चा (cartilage) सरळ नसल्यामुळे एका बाजूला वाकलेले असते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. -
समांथा
समांथा रुथ प्रभूला ‘मायोसिटिस’ (Myositis) नावाचा ऑटोइम्यून आजार आहे. मायोसिटिस म्हणजे शरीरातील स्नायूंची जळजळ. हा एक ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्याच शरीरावर हल्ला करते, ज्यामुळे स्नायूंना सूज येते. -
अमिताभ बच्चन
वयानुसार अमिताभ बच्चन यांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यांना हिपॅटायटीस बी, मायस्थेनिया ग्रॅव्हिस, डायव्हर्टिकुलायटिस, आणि पाठीच्या कण्यातील क्षयरोग (spinal TB) यांसारख्या आजारांचे निदान झाले आहे. याव्यतिरिक्त, त्यांना ॲलर्जी आणि दम्याचा त्रास देखील आहे. -
यामी गौतम
यामी गौतमला केराटोसिस पिलारिस (Keratosis Pilaris) नावाचा त्वचेचा आजार आहे. हा आजार त्वचेवर लहान-लहान पुरळ किंवा रॅशेस (rashes) येणे, तसेच त्वचा कोरडी पडणे असे लक्षणं दर्शवतो. -
अर्जुन कपूर
अर्जुन कपूरला हाशिमोटो थायरॉईडिटिस (Hashimoto’s thyroiditis) नावाचा आजार आहे. हा एक ऑटोइम्यून विकार आहे, ज्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती थायरॉईड ग्रंथीवर हल्ला करते. यामुळे थायरॉईड ग्रंथीला सूज येते आणि ती व्यवस्थित काम करत नाही, ज्यामुळे वजन वाढणे, थकवा आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

मगरीनं बघता बघता १३ वर्षाच्या मुलाला खाऊन टाकलं; गावकरी बघ राहिले अन्…रडणाऱ्या मुलाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल