scorecardresearch

पुणे न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये पुणे शहराशी संबंधित सर्व बातम्या तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. पुणे शहर (Pune City) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले आहे. पुणे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईनंतर ते महाराष्ट्र राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. कारण- अनेक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ पुण्यात आहे. अनेक जण शिक्षणासाठी राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात येत असतात. पुणे शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानीदेखील मानले जाते. उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा पुणे शहर अग्रेसर आहे.


पुणे हे भारतातील सातवे सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर अनेक वेळा ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या दोन छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ज्ञात असलेले हे शहर आहे. शहाजीराजे आणि राजामाता जिजाऊ यांनी पुण्यातील कसबा पेठ येथे लाल महाल बांधला होता. तसेच पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेला शनिवारवाडा, मस्तानी महाल या ऐतिहासिक वास्तू आहेत. पुणे शहरातील स्थानिक घडामोडी, नागरी समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, राजकारण, गुन्हेगारी आणि इतर सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला येथे वाचता येतील.


Read More
BJP, Murlidhar Mohol, Murlidhar Mohol Declares Assets, Worth Rs 24 Crore, Pune Lok Sabha Seat, nomination form, nomination affidavit, pune news, lok sabha 2024, marathi news,
भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे २४ कोटींची मालमत्ता

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे २४ कोटी ३२ लाख ४४ हजार ४८३ रुपयांची जंगम…

man arrested from gujrat after 12 years in wife assulting case
पत्नीला मारहाण प्रकरणात अटक टाळण्यासाठी १२ वर्षे पसार; गुजरातमध्ये नाव बदलून वास्तव्य करणाऱ्या एकास अटक

फरार आरोपी वहीम पटेल याला न्यायालयाने वॉरंट बजावले होते त्याचा ठावठिकाणा न लागल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषीत केले होते. 

pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…

प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तूंमध्ये मोबाइल फोनचे आणि लॅपटॉप बॅगचे प्रमाण सर्वांत जास्त आहे.

Pune Metro, ruby hall, ramwadi Extended Route, Surge in Ridership, Revenue, yerwada metro station, pune citizen in metro, maha metro, marathi news, metro news,
पुणे मेट्रो सुसाट! प्रवासी संख्ये सोबतच उत्पन्नातही मोठी वाढ

पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विस्तारित मार्गामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत…

Sharad Pawar group opposition to one country one election
शरद पवार गटाचा ‘एक देश एक निवडणूक’ला विरोध; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शपथनामा’ प्रसिद्ध

भारतीय जनता पक्षाकडून एक देश एक निवडणुकीवर भर देण्यात येत असताना लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीर केलेल्या…

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम

आदित्य युवराज भांगरे याचा मित्र शंभू भोसले यांच्यासह इतर सहा जणांनी रितेश संजय पवार यांची किरकोळ कारणावरून हत्या केली होती.

traffic jam in pune due to candidates filing nomination
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन; पुण्यात वाहतूककोंडी

या फेरीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेनेसह महायुतीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

pune video really pandavas used to live in pune
VIDEO : पुण्यामधील ‘या’ भागात होतं पांडवांचं वास्तव्य! थेट पांडवकाळाशी संबंध

तुम्हाला माहिती आहे, पुण्यामध्ये पांडवांचं वास्तव्य होतं ते? तुम्हाला वाटेल ते कसं शक्य आहे? पण, हे खरंय.

संबंधित बातम्या