Agniveer Bharti 2024 : अनेकांना भारतीय सैन्यात काम करून देशाची सेवा करायची इच्छा असते. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण
भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करू इच्छिणारे यासाठी अर्ज भरू शकतात. ८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.अग्निवीर भरतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या अटी आहे आणि अर्ज कसा भरावा, हे आज आपण जाणून घेऊ या.

वयाची मर्यादा – अर्ज भरणाऱ्या उमेदवाराचे वय १७ ते २१ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

Rajnath singh agniveer schem
अग्नीवीर योजनेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? राजनाथ सिंहांकडून बदलाचे संकेत; नेमकं काय म्हणाले?
Job Opportunities Army Opportunities for Women career
नोकरीची संधी:  महिलांसाठी लष्करातली संधी
Job Opportunity Opportunities in Indian Army Job career
नोकरीची संधी : भारतीय लष्करातील संधी
Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ साठी अधिसूचना जाहीर, १७,४७१ रिक्त पदांसाठी होणार भरती, कसा करावा अर्ज?

अर्ज शुल्क – अर्ज करण्यासाठी ५५० रूपये शुल्क आहे.

निवड प्रक्रिया – सुरुवातीला भरती परीक्षा होईल. त्यात उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार शारीरिक चाचणी देतील. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया होईल. त्यानंतर मेडिकल होईल. या सर्व टप्प्यातील कामगिरी पाहून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानुसार उमेदवाराची निवड होईल.

अधिकृत वेबसाइट – http://www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २१ मार्च पर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकता.

पद –

१. अग्निवीर जनरल ड्युटी
२. अग्निवीर टेक्निकल
३. अग्निवीर लिपिक
४.अग्निवीर ट्रेडसमेन
५.अग्निवीर व्यापारी
६.अग्निवीर जनरल ड्युटी

भरती प्रक्रिया –

भरती प्रक्रिया दोन टप्प्यात पार पडेल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन संगणक आधारित लेखी परिक्षा होईल आणि दुसऱ्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि निकष भरती प्रक्रिया असेल.

हेही वाचा : IDBI Bank Recruitment 2024 : बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी ‘या’ विभागात होणार भरती

अर्ज कसा भरावा –

सर्व उमेदवारांनी सुरुवातीला अधिकृत बेवबाइट जावे
त्यानंतर CO/OR/Agniveer Apply या लिंकवर किंवा JCO/OR/Agniveer Enrolment या विभागात लॉगिन करावे.
त्यानंतर लॉगिन पेजवर जाऊन अर्ज भरावा.
अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अटी जाणून घ्याव्यात.
अर्ज भरल्यानंतर शेवटी शुल्क भरा आणि प्रिंट डाउनलोड करून घ्या.

अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हणतात. अग्निपथ ही भारत सरकारची योजना आहे. ही भरती फक्त चार वर्षांसाठी असते. चार वर्षानंतर ७५ टक्के अग्निवीरांना सैन्यातून मुक्त केले जाते.