scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी १९९९ मध्ये केली होती. या पक्षाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक आहे. मात्र २०२३ मध्ये हा पक्ष फुटला. जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार ( Ajit Pawar)यांनी बंडखोरी करत मूळ राष्ट्रवादी पक्ष सोडून आपला एक वेगळा गट तयार केला. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीचेही दोन गट झाले. हे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या नावाने ओळखले जातात.


शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने जशी भाजपाची साथ स्वीकारली त्याच मार्गावर अजित पवार आपल्या समर्थकांसह गेले. अजित पवार भाजपा प्रणित महायुतीतील सरकारमध्ये सहभागी झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बहाल केले. अजित पवार गटात प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अमोल मिटकरी, सुनील तटकरे या नेत्यांचा समावेश आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत अजित पवार यांना महाराष्ट्रात केवळ चारच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी केवळ एकाच जागेवर अजित पवार गटाला विजय मिळाला. या उलट शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या होत्या. त्यांना ९ जागा जिंकण्यात यश आले. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गट कमजोर झाल्याचे समजले जात होते. मात्र निवडणुकीत विजयश्री खेचत शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभारी मिळून दिली.


पक्षाची स्थापना ( Formation of NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआमध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी २५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. १० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) घड्याळ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. २०२३ मध्ये राष्ट्रवादी हा पक्ष फुटून त्याचे दोन गट झाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना बहाल केले असून आता अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत.


Read More
Ajit Pawar Bihar Election Confession Performance Internal Conflict NCP Candidates NOTA
‘मी म्हणालो होतो, बिहारच्या निवडणुका लढवू नका!’ अजित दादांचा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीतील अनागोंदी चव्हाट्यावर…

Ajit Pawar, Bihar Election, Prafull Patel : निवडणुकांची तयारी नसतानाही जबाबदारी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती, असे अजित पवार यांनी…

Amravati ncp news loksatta
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेल्या सोमवंशींसह १५ नगरसेवक भाजपमध्ये…

विशेष म्हणजे हा प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक प्रभारी संजय कुटे यांच्याशी चर्चा केल्यानंतर झाल्याचा…

ajit pawar ncp loksatta news
अजित पवारांचा स्वप्नभंग: बिहारमध्ये १६ उमेदवार उभे करण्यामागे राष्ट्रवादीचा हेतू काय ? घड्याळाची मते पाहून धक्का बसेल

अखंड राष्ट्रवादी असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गोवा, बिहार, गुजरात, दिव-दमण येथे बऱ्यापैकी हातपाय पसरले होते.

Chandrakant patil
दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी काही ठिकाणी एकत्र – चंद्रकांत पाटील

आज ईश्वरपूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी विश्वनाथ डांगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Dahanu Mayor elections
डहाणू नगरपरिषद साठी महायुती सह महाविकास आघाडीत फाटाफूट

डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) सह दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले असून त्यांनी एकत्रित येत नगराध्यक्ष…

CM Devendra Fadnavis Warns shivSena BJP Politics Nashik Kumbh Mela Project Transparency Development
मुख्यमंत्र्यांकडून एका दगडात दोन पक्षी; कुंभमेळा कामांवरुन शिंदे गटासह स्वपक्षीयांना इशारा…

Devendra Fadnavis, Kumbh Mela Nashik : मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळ्याची कामे पारदर्शक पद्धतीने होतील आणि कुणालाही झुकते माप दिले जाणार…

shivSena eknath shinde Separate Strategy Nagpur Polls Tumane Independent Path Mahayuti BJP Swabal Ajit Pawar Alliance
साशंक शिंदे सेनेची स्वतंत्र वाटचाल !

Shivsena Eknath Shinde : भाजप नेते सार्वजनिक ठिकाणी महायुतीची भाषा करत असतानाही, शिंदे सेनेने भाजपच्या स्वबळाच्या नीतीला ओळखून नागपूर जिल्ह्यातील…

Ravindra Deshmukh BJP  entry reshapes political equation in Dondaicha dhule
Dhule Politics : माजी मंत्री देशमुखांच्या पाठिंब्याने मंत्री रावलांची गढी मजबूत; अजित पवार गटावर आत्मचिंतनाची वेळ

डॉ. देशमुख यांच्या अनपेक्षित प्रवेशानंतर दोंडाईचा-शिंदखेडा परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

ajit pawar statements create confusion in pune yuti alliances politics tension
अजित पवारांच्या भूमिकेमुळे पुण्यात महायुती, आघाडीत ‘संशयकल्लोळ’

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत चाचपणी करा’ आणि ‘पवारसाहेबांवर प्रेम आहे’ या दोन वक्तव्यांमुळे…

Ajit Pawar NCP news in marathi
पिंपरी : दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याची चर्चा असतानाच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने….

प्रभागातील आरक्षणामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांकडून जाेरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने ३२ प्रभागांतील इच्छुकांकडून…

ncp announces 40 star campaigners for upcoming elections including controversial leaders mumbai news
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकामध्ये वादग्रस्त नेत्यांची वर्णी : एका कुटुंबातील तिघांना संधी, ते लाभधारक कुटुंब कुणाचे ?

नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) ४० स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली.

संबंधित बातम्या