News Flash

पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल; ममतांनी भाजपाविरुद्ध थोपटले दंड

पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल; ममतांनी भाजपाविरुद्ध थोपटले दंड

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचा आक्रमक बाणा दिसून आला. त्यांनी भाजपावर टीकेचे बाण सोडले. देशात पुढील निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा असणार का?, हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. "मी काही राजकीय भविष्यवक्ता नाही. ते तेव्हाच्या स्थितीवर अवलंबून आहे. राजकारणात समीकरणं बदलत असतात. आता विरोधकांना एकत्र येणं गरजेचं आहे. २०२४ च्या निवडणुकीत आम्हाला आशा आहेत. पुढची निवडणूक मोदी विरुद्ध भारत असेल", असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

अन्य बातम्या

मनोरंजन

अन्य शहरे
संपादकीय
 धर्माच्या ‘सीमा’!

धर्माच्या ‘सीमा’!

या दोन राज्यांत जवळपास १६५ कि.मी. लांब सीमारेषा आहे आणि उभय राज्यांतील तीन-तीन जिल्ह्यांतून ती जाते.

लेख
अन्य
 टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

Just Now!
X