रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘रामायण’ हा भारतातील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दोन भाग असून, पहिला भाग २०२६ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर १५० कोटी, साई पल्लवी १२ कोटी, आणि यश १०० कोटी मानधन घेणार आहेत. चित्रपटाचे एकूण बजेट १६०० कोटी आहे.