बॉलीवूडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतही गटबाजी (ग्रुपिझम) होत असल्याचं दिसतं. मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांनी याबद्दल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, गटबाजी थोड्या प्रमाणात असणारच, पण त्याचा विचार न करता आपलं काम चांगलं करणं महत्त्वाचं आहे. गटात सामील होऊन काम मिळतं, यावर त्यांचा विश्वास नाही. विद्याधर जोशी पुन्हा रंगभूमीवर ‘सुंदर मी होणार’ नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.