डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया आणि जपानसह आणखी १२ देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले आहेत. या निर्णयामुळे एकूण १४ देशांवर नव्या टॅरिफ दरांची अंमलबजावणी झाली आहे. म्यानमार आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकवर सर्वाधिक ४०% कर लावला आहे. ट्रम्प यांनी या देशांना पत्रे पाठवून इशारा दिला आहे की, अमेरिकेवर टॅरिफ वाढवल्यास तितकाच प्रतिसाद दिला जाईल.