महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला. या विरोधामुळे सरकारने अध्यादेश मागे घेतला. या घटनेमुळे राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले, ही ऐतिहासिक घटना ठरली. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांचा भाषेबाबतचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेबाबत भूमिका मांडली होती.