-
शाहरुख खान
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे घर ‘मन्नत’ हे मुंबईतील वांद्रे भागात आहे. या आलिशान बंगल्याची किंमत अंदाजे २०० कोटी रुपये आहे. (फोटो स्रोत: @iamsrk/instagram) -
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग
बॉलीवूड पॉवर कपल दीपिका आणि रणवीर यांचे मुंबईत असलेले घर त्याच्या सौंदर्य आणि लक्झरीसाठी ओळखले जाते. या घराची किंमत अंदाजे ११९ कोटी रुपये आहे. (फोटो स्रोत: @deepikapadukone/instagram) -
अमिताभ बच्चन
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील ‘जलसा’ हे बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध घरांपैकी एक आहे. या आलिशान बंगल्याची किंमत ११२ कोटी रुपये आहे. (फोटो स्रोत: @amitabhbachchan/instagram) -
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे ‘किनारा’ हे घर मुंबईत आहे. या घराची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. हे घर समुद्र किनाऱ्यावर वसलेले असून त्याच्या भव्य रचनेसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो स्रोत: @theshilpashetty/instagram) -
हृतिक रोशन
हृतिक रोशनच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत ९७ कोटी रुपये आहे. हे घर आधुनिक वास्तुकला आणि लक्झरी सुविधांनी सुसज्ज आहे. (फोटो स्रोत: @rithikroshan/instagram) -
अजय देवगण आणि काजोल
अजय देवगण आणि काजोलचे मुंबईतील घरही एखाद्या महालापेक्षा कमी नाही. या आलिशान घराची किंमत जवळपास ६० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. (फोटो स्रोत: @kajol/instagram) -
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
अनुष्का आणि विराटच्या मुंबईतील घराची किंमत जवळपास ३७ कोटी रुपये आहे. हे घर त्याच्या सुंदर स्थानासाठी आणि आधुनिक इंटीरियरसाठी प्रसिद्ध आहे. (फोटो स्रोत: @anushkasharma/instagram) -
सैफ अली खान
सैफ अली खानचा ‘पतौडी पॅलेस’ हा बॉलिवूड स्टार्समधील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. या राजवाड्याची किंमत सुमारे ८०० कोटी रुपये आहे. हा वाडा हरियाणामध्ये आहे. (फोटो स्रोत: @kareenakapoorkhan/instagram) -
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
रणबीर आणि आलियाचे नवीन घर ‘वास्तू’ त्यांच्या लग्नानंतर प्रकाशझोतात आले. हे सुंदर घर वांद्रे येथे आहे आणि त्याची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये आहे. (फोटो स्रोत: @aliaabhatt/instagram)
हेही वाचा- तमन्ना भाटियाचा नवा लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल