स्मार्टफोन आपल्याला अनेक सुविधा तर देतोच. पण, कधी कधी युजर्सचे टेन्शनसुद्धा वाढवतो. अचानक फोन खराब होतो. त्यामुळे त्यातील डेटा देखील जातो. अशावेळी फोटो, व्हिडीओ तर काही महत्वाच्या फाइल्स सुद्धा डिलीट होऊन जातात. पण हे फोटो, व्हिडीओ, फाईल्स आपण संगणक, लॅपटॉपमध्येही ट्रान्सफर करून ठेवू शकतो. ॲण्ड्रॉइड आणि आयफोनमध्ये सेटिंग्स म्हणा किंवा फीचर खूप वेगळे असतात. तर आज आपण आयफोनमधून फोटो, व्हिडीओ, फाइल्स कशा ट्रान्सफर करायच्या याच्या दोन सोप्या पद्धती पाहणार आहोत.

१. आयफोनमधून फोटो ट्रान्सफर करण्यासाठी पुढील स्टेप्स नक्की करा फॉलो –

यूएसबी (USB) केबल वापरून तुमचा आयफोन संगणक किंवा लॅपटॉपला कनेक्ट करा.

आता तुमचा मोबाइल अनलॉक करा. कारण तुमचा मोबाइल लॉक केलेला असल्यास संगणक किंवा लॅपटॉप तुमचे डिव्हाइस शोधू शकणार नाही.

तुम्हाला आता ‘ट्रस्ट दिस कॉम्प्युटर’ प्रॉम्प्ट दिसेल. ट्रस्ट किंवा Allow वर क्लिक करा. हे तुमच्या संगणक, लॅपटॉपला तुमच्या आयफोन फोटोमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देईल.

तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपवर Start windows बटण निवडा आणि फोटोज ॲप उघडा.

यूएसबीमधून इम्पोर्ट हा पर्याय सिलेक्ट करा

तुम्हाला संगणकावर जे फोटो शेअर करायचे आहेत ते निवडा आणि फाइल्स कुठे सेव्ह करायच्या आहेत तेसुद्धा ठरवा. फोटो शेअर होईपर्यंत काही वेळ प्रतीक्षा करा.

अशाप्रकारे फाईल्स, फोटो, व्हिडीओ तुमच्या फोनमधून संगणक किंवा लॅपटॉपवर शेअर केल्या जातील.

हेही वाचा…आता हायस्पीड डेटासह पाहा वेब सिरीज; जिओच्या नवीन प्लॅनमध्ये ‘या’ १५ OTT प्लॅटफॉर्म्सचं मिळणार मोफत सब्स्क्रिप्शन; पाहा यादी

२. तुमच्याकडे आयक्लाउड किंवा आय ट्यून्स नसल्यास आयफोनमधून फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…

यूएसबी (USB) केबल वापरून तुमचा आयफोन संगणक किंवा लॅपटॉपला कनेक्ट करा.

तुमच्या फोनवरील फोटो आणि व्हिडीओमध्ये प्रवेश करण्यासाठी या डिव्हाइसला अनुमती देण्याची सूचना दिसेल. तेथे ‘Allow द्या’ वर क्लिक करा.

तुमच्या PC वर File Explorer उघडा. तुम्हाला डाव्या साइडबारवर नवीन डिव्हाइसमध्ये आयफोन हा पर्याय दिसेल.

साइडबारवरील नवीन म्हणून सूचीबद्ध केलेला आयफोन पर्यायावर डबल-क्लिक करा आणि तुम्हाला “DCIM” फोल्डर दिसेल.

DCIM फोल्डरमध्ये तुम्हाला तुमच्या फोनवर असलेल्या फोटोंच्या संख्येनुसार सबफोल्डर दिसतील.

एकदा तुम्ही फोटो शेअर करण्यासाठी फोटो किंवा फोल्डर निवडलात की, तो पीसीवर तुमच्या निवडलेल्या ठिकाणी ड्रॅग आणि ड्रॉप करा.

तुम्ही फाइल, फोटो किंवा व्हिडीओ कॉपी की Move करत आहात याची खात्री करून घ्या. कारण “Move” या पर्यायाने आयफोनमधून फोटो डिलिट होतील. जर तुम्हाला तुमच्या फोनची मेमरी क्लिअर करायची असल्यास फाइल Move करणे हा एक चांगला पर्याय ठरेल.

अशाप्रकारे तुम्ही सहज फोटो शेअर करू शकता.