मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आलं. अभिनेता सुमीत राघवनने या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याने हिंदी सक्ती नसावी आणि महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असावी, असं मत व्यक्त केलं. मराठी शाळांना अभिजात दर्जा मिळावा आणि शिक्षकांच्या समस्यांवर लक्ष द्यावं, अशी मागणीही केली. मराठी भाषेसाठी सुमीतने आपली भूमिका स्पष्ट केली.