Best Electric Car : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सुरूवातीला दुचाकी आणि आता कार सुद्धा आवडीने लोक खरेदी करताना दिसत आहे. बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या आहेत. या गाड्यांची किंमत लाखापासून कोटींच्या घरात आहे. या कारचे अनेक फायदे सुद्धा आहे.जसे की तुम्ही या गाड्या घरी चार्जिंग करू शकता. याच्या मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो. एकंदरीत या गाड्यांना खूप कमी खर्च लागतो. पर्यावरणाला हानी पोहचत नाही. शुन्य उत्सर्जन असल्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. इलेक्ट्रिक गाड्यांच्या लिस्टमध्ये टाटा, किआ, हुंडई, MG आणि BYD च्या मॉडल्सचा समावेश आहे. तु्म्हाला सुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे का? जर हो तर एकापेक्षा एक भारी गाड्यांची लिस्ट एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
टाटा पंच ईवी कार

टाटा पंच ईवी कार सर्वात लोकप्रिय ईवीमधील एक आहे. ही कार एकदा चार्जिंग केल्यानंतर ४२१ किलोमीटर प्रवास करू शकते. टाटाची ही यकार ९.५ सेकंदामध्ये ० ते १०० किमी प्रति तास वेगाने धावू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत १०,९८,९९९ रुपयांपासून सुरू आहे.

BYD Seal

BYD Seal ही एक लोकप्रिय आणि स्टायलिश इलेक्ट्रिक कार है. ही कार ५७० किलोमीटरच्या रेंजमध्ये धावते. ही कार ३.८ सेकंद मध्ये ० से १०० किमी प्रति तास वेगाने धावू शकते. BYD च्या या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत ४३.२७ लाख रुपयांपर्यंत आहे.

हेही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! Swift नव्या अवतारात ९ रंगात अन् कमी किमतीत देशात दाखल, मायलेज २५.७५ किमी

Kia EV6

Kia EV6 एकदा चार्जिंग केल्यानंतर उत्तम रेंज देणारी कार आहे. ही कार ७०८ किलोमीटरच्या रेंजमध्ये चालते. या कारला फक्त १८ मिनिटांममध्ये १० टक्क्यांपासून ८० टक्क्यांपर्यंत चार्ज केल्या जाऊ शकते.

Hyundai Ioniq 5

Hyundai Ioniq 5 ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. ह्युंदाईची ही कार कार एकदा चार्जिंग केल्यानंतर ६३१ किमी दूर जाऊ शकते. ही कार १८ मिनिटांमध्ये १० टक्क्यांपासून ८० टक्क्यांपर्यंत चार्जिंग करू शकते. या कारची एक्स शोरूम किंमत ४६.०५ लाख रुपयांपासून सुरू होते.

MG Comet EV

MG Comet EV ही एक बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एकदा चार्जिंग केल्यानंतर २३० किलोमीटरची रेंज देते. इस कार मध्ये १०.२५ इंचच्या इंटीग्रेटेड फ्लोटिंग वाइडस्क्रीन लावली आहे. MG च्या या कार च्या एक्स-शोरूम किंमत ७.३८ लाख पासून १०.५६ लाखांपर्यंत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best electric car list from cheap to expensive electric vehicle electric cars in india ev cars price 2024 mileage and images ndj
Show comments