मारुती सुझुकीने भारतात नवीन जनरेशन स्विफ्ट (२०२४ मारुती स्विफ्ट) लाँच केली आहे. नवीन स्विफ्ट एकूण ९ बाह्य रंगांमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये सिंगल टोन आणि ड्युअल टोन असे दोन प्रकारचे रंग समाविष्ट आहेत. कंपनीने या कारला अधिक स्टायलिश डिझाईनसह सादर केले आहे. आता कंपनी लवकरच नवीन स्विफ्टचे CNG मॉडल पण घेऊन येणार असल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन मारुती स्विफ्टचे मायलेज देखील समोर आले आहे, जे त्याच्या जुन्या मॉडेलपेक्षा १४ टक्के अधिक आहे. कंपनीच्या मते, स्विफ्टचे मायलेज मॅन्युअल व्हेरियंटमध्ये २४.८ kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये २५.७५ kmpl आहे. २०२४ मारुती स्विफ्ट पाच प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. यात LXi, VXi, VXi (O), ZXi आणि ZXi+ चा समावेश आहे. हे नऊ वेगवेगळ्या पेंट पर्यायांमध्ये देखील उपलब्ध असेल, ज्यामध्ये मोनोटोन आणि ड्युअल-टोन दोन्ही पर्यायांचा समावेश आहे.

नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर नवीन पिढीच्या मारुती स्विफ्टमध्ये आता अनेक नवीन फीचर्स उपलब्ध आहेत. कंपनी तिच्या सर्व प्रकारांमध्ये ६ एअर बॅग मानक म्हणून देत आहे. याशिवाय, हिल होल्ड असिस्ट, थ्री पॉइंट सीट बेल्ट आणि नवीन सस्पेंशन सेटअप देखील देण्यात आला आहे. २०२४ स्विफ्टच्या केबिनमध्ये आता पूर्वीपेक्षा मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट प्रणाली आहे, जी Baleno आणि Ford द्वारे प्रेरित आहे. या कारमध्ये ऑल-ब्लॅक इंटिरिअर थीम देण्यात आली आहे. यामध्ये ४० हून अधिक कार कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

(हे ही वाचा : हिरोच्या बाईक सोडून आता पहिल्यादांच ‘या’ कंपनीच्या बाईक स्कूटर्सच्या मागे लागले भारतीय, झाली दणक्यात विक्री )

नवीन मारुती स्विफ्टमध्ये जुन्या स्विफ्टपेक्षा बरेच बदल करण्यात आले आहे. तिचा आकार वाढविण्यात आला आहे. नवीन स्विफ्टची लांबी ३,८६० मिमी, रुंदी १,६९५ मिमी आणि उंची १,५०० मिमी आहे. हे त्याच्या जुन्या मॉडेलपेक्षा १५ मिमी लांब, ३० मिमी उंच आणि ४० मिमी रुंद आहे. मात्र, त्याचा व्हीलबेस जुन्या मॉडेलप्रमाणेच आहे.

इंजिन आणि ट्रान्समिशन

नवीन जनरेशन स्विफ्टमध्ये, कंपनीने नवीन Z-सीरीज १.२-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले आहे जे ८२ एचपी पॉवर आणि १०८ एनएम टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल गिअरबॉक्ससह, इंजिन देखील CVT ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. सौम्य-हायब्रिड तंत्रज्ञान त्याच्या काही प्रकारांमध्ये देखील उपलब्ध आहे. नवीन स्विफ्टला ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड ऑटोमॅटिक असे दोन्ही गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. नवीन स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत ६.४९ लाख रुपये आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत एक्स-शोरूम ९.६५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki has officially launched the fourth generation swift in the country pdb