भारतात आयोजित केलेली दोन दिवसीय जी २० शिखर परिषद संपूर्ण जगाने पाहिली आहे आणि त्यांचे खूप कौतुक झाले आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेसह सर्व जागतिक संस्थांनी मान्य केले आहे. जी २० मध्ये ज्या सदस्य देशांनी भारताच्या प्रस्तावांना एकापाठोपाठ एक सहमती दर्शवली, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका स्वप्नालाही या शिखर परिषदेत एक प्रकारे मान्यता मिळाली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत २०४७ पर्यंत विकसित देश बनणार

इंडिया टुडेचे राहुल कंवल यांनी गीता गोपीनाथ यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्यांनी भारताच्या प्रगतीचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पाहिलेल्या स्वप्नाचा उल्लेख त्यांनी आणि त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांनी अनेक प्रसंगी केला आहे. यापैकी एक म्हणजे भारत २०४७ पर्यंत जगातील विकसित देशांच्या यादीत पोहोचणे आणि येत्या पाच ते सहा वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणे आहे, असंही त्या म्हणाल्या. आज अर्थव्यवस्था वेगाने हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आता तर जागतिक संस्थांनीही पंतप्रधान मोदींच्या या स्वप्नांवर आपल्या मान्यतेचा शिक्का मारला आहे. जी २० मध्ये सहभागी होण्यासाठी देशात आलेल्या भारतीय वंशाच्या IMF उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे की, जागतिक वाढीचे इंजिन म्हणून भारताची भूमिका नाकारता येणार नाही.

हेही वाचाः शेअर बाजारात नवा विक्रम, गुंतवणूकदारांनी ६ तासांत ३.३१ लाख कोटींची केली कमाई

चार वर्षांत भारत बनणार तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

२०२७-२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, येत्या काही वर्षांत भारत जागतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल आणि जागतिक विकासात देशाचे योगदान १५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांनी श्रमिक बाजारपेठ सुधारणे, व्यवसाय सुलभ करणे, शिक्षणाचा दर्जा आणि महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवणे यावर विशेष भर दिला आहे.

हेही वाचाः विश्लेषण : जी २० मध्ये सहमती झालेलं ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स काय? पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

६ टक्के वाढीचा अंदाज

गीता गोपीनाथ यांच्या मते, भारताबाबत जे आकडे समोर येत आहेत, त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका घेण्याचे कारण नाही. भारतीय अर्थव्यवस्था समाधानकारक गतीने प्रगती करीत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ६ टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, उच्च पातळीवरील वाढ राखण्यासाठी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहेत. IMF च्या गीता गोपीनाथ यांनीच नव्हे तर भारताने उचललेल्या पावलांचे जगातील सर्व जागतिक संस्थांनी कौतुक केले आहे.

जपान आणि जर्मनीला भारत मागे टाकेल

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आधीच जाहीर केलेल्या अंदाजानुसार, २०२७ मध्ये जपान आणि जर्मनीसारख्या देशांना मागे टाकून भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. २०१४ ते २०२३ या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेने अनेक नवे टप्पे गाठले आहेत. २०१४ मध्ये ते १० व्या स्थानावर होते आणि आज ते जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा जगातील सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडल्या होत्या, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था या उद्रेकातून सावरली आणि अशी गती मिळवली की, संपूर्ण जगाने भारताला एक देश म्हणून ओळखले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This big dream of pm modi will be fulfilled in next 4 years india will overtake many big countries imf gita gopinath confirms vrd