दुकानदारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचे ई-संकेतस्थळांकडे मात्र दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोटार वाहन कायद्यात बंदी असताना ध्वनी प्रदुषणात भर घालणाऱ्या कर्णकर्कश वाहन भोंग्यांची ऑनलाइन विक्री मात्र, तेजीत सुरू आहे. आवाजी भोंग्यांचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी कडक कारवाई चालवली असली तरी संकेतस्थळांवर असे भोंगे ७०० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत सर्रास उपलब्ध असल्याने ‘उपद्रवी’ वाहनचालकांचे चांगलेच फावले आहे.

सध्या शहरात दरवर्षी १ लाख दुचाकी आणि ४० हजार चारचाकींची भर पडत आहेत. यातील किमान ८ ते १० टक्के चालक वाहनांवर अतिआवाजी वाहन भोंगे बसवत आहेत. त्यातच आता रिक्षा-टॅक्सी चालकांकडूनही हे भोंगे बसवले जात आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पोलीस अशा चालकांवर कारवाई करण्याविषयी गंभीर नसल्याचे दिसून येते. बेदरकारपणे वाहन चालवून कणकर्कश भोंगे वाजवणाऱ्या उपद्रवी वाहनचालकांमुळे ध्वनीप्रदुषणात भर पडतेच; पण अनेकदा अशा भोंग्यांमुळे अपघात घडल्याच्याही घटना घडल्या आहेत. मोठ्या महामार्गावर अशा भोंग्यांचा वापर अधिक होतो. साध्या इलेक्ट्रिक भोंग्यांपेक्षा आवाजी भोंगे तीनपट अधिक आवाजी असल्याचे उघड होते. यात तीन प्रकार उपलब्ध आहेत. उच्च दाबाचा भोंगा ८४० हार्ट्झ, मध्यम दाबाचा ७९५ हार्ट्झ आणि ६३० हार्ट्झ अशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

मोटार वाहन कायद्यानुसार..

दुचाकीवर ८० डेसिबलच्या पुढे जाणाऱ््या आवाजाचे भोंगे (हार्न) वापरु नयेत. तर चारचाकी आणि रिक्षावरही ८२ डेसिबल तर मोठय़ा बस गाडय़ा आणि लॉरी सारख्या वाहनांवर ९१ डेसिबलच्या पुढे जाणाऱ्या आवाजाचे भोंगे वापरू नयेत. तसेच शांतता झोन, रुग्णालये आणि शाळा येथे हार्न वाजवण्यास परवानगी नाही. उल्लंघन केल्यास १०० रुपये दंड आकारला जातो.

किमान २ हजार चालकांवर कारवाई

शहरात वाहनांवर आवाजी भोंगे बसवणाऱ्या किमान २ हजार चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र दंडांची रक्कम अतिशय कमी असल्याने कारवाई करूनही हे प्रमाण कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound pollution in mumbai car horn
Show comments