Premium

गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च! ओपन एआयच्या चॅट जीपीटीला टक्कर

गुगलने सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च केले आहे…

Technology News Google Gemini AI Launched Three Variants Beats Openais GPT 4 in benchmarks
(फोटो सौजन्य:एक्स (ट्विटर)@sundarpichai) गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च!

टेक कंपनी गुगल आता चॅट जीपीटीशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक व्हिडीओ आणि एक पोस्ट शेअर केली आहे. गुगलने आपले नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल लाँच केले आहे. हे एआय टूल्स एखादी वस्तू किंवा गोष्ट माणसांप्रमाणे समजवून सांगण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.जेमिनी हे एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे जे समजून घेणे, तर्क करणे, कोडिंग आणि नियोजन यांसारख्या कार्यांमध्ये इतर मॉडेल्सपेक्षा जास्त चांगले काम करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल जेमिनी हे प्रो, अल्ट्रा आणि नॅनो या तीन आवृत्त्यांमध्ये सादर केले गेले आहे. प्रो व्हर्जन आधीच उपलब्ध आहे आणि अल्ट्रा व्हर्जन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होईल असे सांगण्यात येत आहे. गुगलने नवीन जेमिनी प्रोला त्याच्या चॅटबॉट बार्डसह एकत्रित केले आहे. जेमिनी प्रो (Gemini Pro) ची आवृत्ती चॅटबॉट ‘Bard’ मध्ये वापरली जाऊ शकते ; जी भारतासह १७० देश आणि प्रदेशांमध्ये इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल.

हेही वाचा…भारत चंद्रावर अंतराळवीर पाठवणार? पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, मोहिमेचं वर्षही जाहीर केलं

पोस्ट नक्की बघा :

जेमिनी हे मॅसिव्ह मल्टीटास्क लँग्वेज अंडरस्टँडिंग मॉडेलवर आधारित आहे. जेमिनी हे गुगलच्या डीपमाईंड (DeepMind) विभागाद्वारे विकसित मॅसिव्ह मल्टीटास्क लँग्वेज अंडरस्टँडिंग मॉडेल (MMLU)वर आधारित आहे. तसेच हे मॉडेल प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ५७ भाषा वापरते. जेमिनी मॉडेलच्या अल्ट्रा व्हेरिएंटने ३२ पैकी ३० बेंचमार्क चाचण्यांमध्ये चॅट जीपीटी ४ ला (ChatGPT 4) मागे टाकले. जेमिनी प्रोने चॅट जीपीटीच्या मोफत आवृत्ती, जीपीटी ३.५ ला ८ पैकी ६ बेंचमार्क चाचण्यांमध्ये मागे टाकले आहे.

गुगलचा दावा आहे की, जेमिनी ओपन एआयच्या (Open AI) चॅट जीपीटी ४ (ChatGPT 4) पेक्षाही चांगले आहे आणि अधिक चांगले कामसुद्धा करू शकते. नवीन एआय मॉडेल मजकूर, ऑडिओ, प्रतिमा आणि व्हिडीओ व इतर अनेक प्रकारची माहिती सहजपणे समजू देण्यास मदत करेल .जेमिनी चॅटबॉट मजकूर आणि कोड तसेच प्रतिमा तयार करू शकतात आणि वाचूसुद्धा शकतात. ओपन एआय कंपनीच्या ChatGPT 4 सह, वापरकर्ते प्रतिमा तयार करू शकत नाहीत. जेमिनी मल्टीटास्किंग करण्यासदेखील सक्षम आहे आणि एकाच वेळी मजकूर प्रतिमा आणि कोडवर कार्य करू शकतो. तर, चॅट जीपीटी वापरकर्ते एकाच वेळी मल्टीटास्किंग करू शकत नाहीत.सुंदर पिचाई यांनी व्हिडीओमध्ये या एआय जेमिनी मॉडेलचा पुरावा म्हणून एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे ; ज्यात हे मॉडेल विविध वस्तू आणि गोष्टींचे अचूक वर्णन करून दाखवते आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Technology news google gemini ai launched three variants beats openais gpt 4 in benchmarks asp

First published on: 07-12-2023 at 17:44 IST
Next Story
Spotify कर्मचाऱ्याला ई-मेलवरून दिली नोटीस! नोकरीवरून काढताच केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘माझ्यासाठी हा ड्रीम…’