दूरसंचार विभागाने [Dot], सिमकार्डविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून व्होडाफोन, जिओ आणि एअरटेलसारख्या कंपन्यांनी या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले आहे. संपूर्ण देशामध्ये सिमकार्ड घेताना व्हेरिफिकेशनसाठी, केवायसीच्या प्रत्यक्ष कागदपत्रांचा [पेपर बेस्ड KYC] वापर बंद करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात येणार असून, यामुळे खरेदी-विक्री प्रक्रिया सुरळीत होणे, कोणताही फ्रॉड/ फसवणूक होऊ नये अशा सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन KYC पद्धत कशी असेल?

सध्या एखादे सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात फॉर्म भरावा लागतो, फोटो चिकटवावे लागतात. त्यासोबतच ओळखपत्राचा आणि राहत्या जागेचा पुरावा अशी सगळी कागदपत्रं जमा करावी लागतात. परंतु, नवीन वर्षापासून ही संपूर्ण KYC पद्धत डिजिटल पद्धतीने होणार आहे.

दूरसंचार विभाग नेमके काय म्हणते?

“वेळोवेळी KYC व्यवहारामध्ये विविध बदल केल्यानंतर, आता ०९-०८-२०१२ मधील नियमांमध्ये बदल करून, ग्राहकांची ओळख ही प्रत्यक्ष कागदपत्रांचा वापर न करता, केवळ डिजिटल पद्धतीने १ जानेवारी २०२४ पासून केली जाईल”, असे दूरसंचार विभागाच्या नोटिफिकेशनद्वारे समजते.

या बदलांमुळे सर्व प्रोसेस अधिक सुरळीत होऊन, सध्याच्या वाढत्या फ्रॉड/फसवणुकीचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. या नियमानुसार सिमकार्ड खरेदी-विक्री करताना कोणते बदल होणार आहेत हे पाहा.

हेही वाचा : डिसेंबरच्या ‘या’ तारखेला GTA 6 चा ट्रेलर येणार… ग्रँड थेफ्ट ऑटो ६ गेमच्या रिलीजची तारीख आणि त्यामध्ये कोणते नवीन बदल होणार ते पाहा

१. रजिस्ट्रेशन प्रोसेस

नवीन नियमानुसार बेकायदेशीर गोष्टींमध्ये PoS [पॉईंट टु सेल] एजंट्स सहभागी होऊ नये, यासाठी त्यांना दूरसंचार सेवा प्रोव्हायडरसोबत अथवा परवानाधारकांसोबत ॲग्रीमेंट करावे लागेल. PoS एजंट्स जर अशा कोणत्या बेकायदेशीर गोष्टींचा भाग असल्याचे समोर आले, तर त्यांना १० लाखांचा दंड करण्यात येणार असून केलेलं ॲग्रीमेंट तीन वर्षांसाठी टर्मिनेट करण्यात येणार आहे.

२. KYC चे नियम

नवीन नियमांनुसार, एखादे नवे सिमकार्ड विकत घ्यायचे असल्यास किंवा चालू असणाऱ्या नंबरवरून नवीन सिमकार्ड घ्यायचे असल्यास डेमोग्राफिक माहिती [demographic details] देणे आवश्यक आहे. ही माहिती सिमकार्ड घेणाऱ्या व्यक्तीच्या आधारकार्डवर असणाऱ्या क्युअर कोड [QR code] स्कॅन करून घेण्यात येणार आहे.

जुन्या वापरकर्त्याने एखादा नंबर बंद केल्यानंतर ९० दिवसांनी तो नवीन वापरकर्त्याला देण्यात येईल. सिमकार्ड बदलण्यासाठी वापरकर्त्याला संपूर्ण KYC प्रक्रियेतून जावे लागणार असून, इनकमिंग आणि आउटगोइंग एसएमएस प्रक्रियेवर २४ तासांचा बार राहणार आहे.

३. एकावेळी अनेक सिमकार्ड बल्कमध्ये घेणे

सरकारने, डिजिटल फ्रॉड /फसवणूक होऊ नये यासाठी बल्कमध्ये केल्या जाणाऱ्या सिमकार्ड विक्रीवर बंदी घातली आहे. परंतु, तुम्हाला जर व्यवसायासाठी किंवा कामासाठी जास्त सिमकार्ड्स घ्यायचे असल्यास, प्रत्येक सिमकार्ड वापरकर्त्याला KYC चे नियम लागू होतील. दरम्यान, ग्राहक एका आयडी कार्डवर ९ सिमकार्ड विकत घेऊ शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These five morning habits will keep you fit and healthy in this cold winter season dha 99