मोबाईल हे गरज नसून व्यसन झाले आहे. आपल्यापैकी बहुतेकजण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल वापरत असतात. मोबाईच्या आहारी जाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या चिंतेची बात ठरत आहे. मोबाईलच्या आहारी जाऊन लोक काय करू शकतात हे दाखवणारा हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मोबाईलवर बोलण्याच्या नादात महिला चक्क बाळाला फ्रिजमध्ये ठेवते आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

व्हायरल व्हिडीओ @Prof_Cheems नावाच्या इंस्टाग्राम अकांउटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भयानक पालकत्व” व्हायरल व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, “एक महिला मोबाईलवर बोलत आहे. तिचे लहान बाळ एकटेच खेळत आहे. महिला बाळासह खेळण्याऐवजी मोबाईलवर बोलण्यात गुंग आहे. महिला बाळाच्या समोरच चाकू घेऊ भाजी कापते. त्यानंतर भाजी ऐवजी ती बाळाचा उचलून फ्रिजमध्ये ठेवते. हे सर्व करताना ती मोबाईलवर बोलत असते. मोबाईलवर बोलण्च्याचा नादात तिने बाळाला फ्रिजमध्ये ठेवल्याचे लक्षात येत नाही. त्यानंतर काही वेळ महिला घरातील कामे करते आणि सोफ्यावर बसते. बाळ तोपर्यंत फ्रिजमध्येच आहे असे दाखवले आहे. त्यानंतर महिलेचा पती तेथे येतो. काही वेळाने त्याच्या लक्षात येते की बाळ घरात दिसत नाही त्यानंतर दोघेही बाळाची शोधाशोध सुरु करतात. घरात बाळ दिसेनासे झाल्यावर महिला रडू लागते. महिलेचा पती बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून फ्रिजपर्यंत जातो. फ्रिज उघडून पाहतो तर बाळ फ्रिजमध्ये असते. तो बाळाला बाहेर काढतो आणि महिलेला ओरडतो. महिला बाळाला पाहून धावत त्याच्याजवळ जाते त्याला उचलून घेते. “

हेही वाचा – “किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

हेही वाचा – माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या टाईम लॅप्स व्हिडीओमध्ये हे सर्व दृश्य रेकार्ड केले आहे. व्हिडीओ स्क्रिप्टेड असल्याचा दावा केला जात असला तरी सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ आतापर्यंत ३.९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, कृपया स्मार्टफोन्स ऐवजी मुलांची काळजी पण, अनेकांनी असा युक्तिवाद केला की व्हिडिओ खूप स्क्रिपटेड वाटत आहे. हा मुद्दा मांडताना, एका X वापरकर्त्याने गंमतीने नमूद केले, “मूळ पटकथा’ श्रेणीसाठी ऑस्करला पात्र आहे.” वाढत्या उष्णतेच्या मुद्दयावरून दुसऱ्याने उपाहात्समकपणे म्हटले की, “ती फक्त त्या मुलाला भारतातील उष्णतेपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती.”