बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भारतातील केंद्रांमध्ये (ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स- जीसीसी) काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण २८ टक्के असल्याचे सांगणारा एक नवीन अहवाल समोर आला आहे. भारतात या केंद्रांमध्ये एकूण जवळपास १६ लाख कर्मचारी आहेत. याचा अर्थ जवळजवळ ५ लाख स्त्रिया ‘ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स’मध्ये काम करताहेत. यात ‘डीप टेक’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण २३ टक्के आहे. भारतातील प्रथम श्रेणीत येणाऱ्या शहरांत बंगळुरूमध्ये ‘जीसीसी’ केंद्रांत सर्वाधिक- म्हणजे ३१.४ टक्के स्त्रिया आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्युअर स्टोरेज’ आणि ‘झिनोव्ह’ या कंपन्यांनी केलेल्या ताज्या पाहणीतली ही निरीक्षणे आहेत. २००४ ते २०२३ या कालावधीत ४२ उत्तमोत्तम अभियांत्रिकी संस्थांतून शिकलेल्या आणि आघाडीच्या कंपन्यांनी ‘उचललेल्या’ विद्यार्थिनींबाबत यात अभ्यास करण्यात आला. तसेच ‘डीप टेक’ क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची मते घेण्यात आली.

हेही वाचा – बाबांनी विकली भाजी, आईनं ठेवलं सोनं गहाण; UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या स्वातीची प्रेरणादायी गोष्ट पाहा

वरवर पाहता ‘जीसीसी’ केंद्रांमध्ये ५ लाख स्त्रिया असणे, हे प्रमाण समाधानकारकच वाटते. पण या आकडेवारीसह आणखीही काही मुद्दे हा अहवाल मांडतो. या ‘जीसीसी’ केंद्रांत ‘एग्झिक्युटिव्ह लेव्हल- १’ या उच्चपदी पोहोचणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण मात्र केवळ ६.७ टक्के आहे. ‘डीप टेक’मधील ‘जीसीसी’ केंद्रांत तर हे प्रमाण ५.१ टक्के आहे. असे का होते?… याबद्दल हा अहवाल म्हणतो, की जसजशा स्त्रिया त्यांच्या करिअरमध्ये एकेक वरची पायरी गाठत जातात, तसतशी त्यांच्या संख्येस गळती लागते. कुटुंबाची जबाबदारी, लहान मुले आणि वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी, उत्कर्षाची संधीच कमी मिळणे, ऑफिसची कामे आणि घरचे काम याचे संतुलन (वर्क-लाईफ बॅलन्स) न साधता येणे, ही त्याची काही ठळक कारणे आहेत. काही कंपन्यांनी हे टाळण्यासाठी आणि स्त्रियांचे प्रमाण टिकावे यासाठी काही विशेष कार्यक्रम हाती घेतले आहेत. असे प्रयत्न वाढवण्याबरोबरच मुळात आणखी मुली विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (‘स्टेम’ अभ्यासक्रम) या विषयांमधील अभ्यासक्रमांकडे वळतील, यासाठी त्यांनी प्रोत्साहन मिळायला पाहिजे, असेही यात नमूद केले आहे.

कोणत्याही क्षेत्रास पूर्ण क्षमतेने झेप घ्यायची असेल, तर सर्व प्रकारच्या कल्पना मांडणारे कर्मचारी त्यात काम करत असावेत, जेणेकरून अनेकविध दृष्टिकोन समोर येतील, हे तर सर्वश्रुत आहे. ‘डीप टेक्नॉलॉजी’ क्षेत्राचा सध्या सगळीकडेच बोलबाला असताना भारतात या क्षेत्राला आणखी स्त्री कर्मचारी कसे मिळतील, त्या नोकरीत कशा टिकतील आणि आपली कौशल्ये वाढवत नेऊन वरच्या पदांना कशा पोहोचतील, याचा विचार करावा लागणार आाहे.

हेही वाचा – जयंती बुरुडा… आदिवासी समाजाच्या पॉवर वुमन

‘डीप टेक’ म्हणजे नेमके काय?

‘डीप टेक’ या क्षेत्रात नाविन्यपूर्ण शास्त्रीय वा अभियांत्रिकी शोधांवर आधारित विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश होतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, ऑगमेंटेड रीॲलिटी- व्हर्च्युअल रीॲलिटी (एआर-व्हीआर), रोबोटिक्स, बिग डेटा, नॅनोटेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) ब्लॉकचेन्स (उदा. क्रिप्टोकरन्सी निगडित क्षेत्र), क्वान्टम काँप्युटिंग (संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र, गणिताचा एकत्रित वापर करून गुंतागुंतीचे प्रश्न सोडवणारी शाखा), अशा प्रकारच्या विविध शाखा ‘डीप टेक’मध्ये येतात. केवळ एखादे विशिष्ट उत्पादन बनवणे किंवा एखादी सेवा पुरवणे, याच्या पुढे जाऊन ‘डीप टेक’मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने समाजापुढचे प्रश्न सोडवणे, मानवी जीवनाची गुणवत्ता वाढवणे, यासाठी केला जातो.

lokwomen.online@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 lakh women employees in india centers of multinational companies however only 67 percent of top executives ssb