Mercury Retrograde In Aries: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन करीत असतो. त्यात आता ग्रहांचा राजकुमार बुध हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जात; ज्याच्या राशी परिवर्तनामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. सध्या बुध मेष राशीत विराजमान आहे; पण २ एप्रिल रोजी बुध वक्री चाल कर करत मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना बुध ग्रहाच्या वक्री चालीमुळे विशेष लाभ मिळू शकतो; तर काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊ की, बुध ग्रहाच्या उलट्या चालीमुळे कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मेष (Aries)

बुधाची प्रतिगामी गती ही मेष राशीच्याच लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी विशेषत: पैशाशी संबंधित बाबींमध्ये थोडे सावध राहण्याची गरज आहे. कारण- अनावश्यक खर्चामुळे त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येऊ शकतात. आर्थिक योजनांबाबत थोडे सावध राहा. कुटुंबाबरोबर काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक अहंकार आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा; अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात. भूतकाळातील काही गोष्टी वैयक्तिक आयुष्यात समोर येऊ शकतात. त्यामुळे तुमच्या भावनांवर थोडे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri sjr
First published on: 30-03-2024 at 11:41 IST