वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत संक्रमण करून, शुभ आणि अशुभ योग तयार करीत असतो; ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो. त्यात आता धनाचा दाता शुक्र ३१ मार्चला म्हणजेच आज मीन राशीत प्रवेश करणार आहे; जिथे राहू ग्रह आधीपासूनच स्थित आहे. अशा स्थितीत राहू आणि शुक्र या दोन ग्रहांच्या संयोगाने विपरीत राजयोग तयार होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. पण, या अशा तीन राशी आहेत; ज्यांचे नशीब यामुळे अधिक चमकू शकते. तसेच त्यांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊ या भाग्यशाली राशी कोणत्या ते…

कर्क

राहू आणि शुक्राचा संयोग कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. ते लक्षात घेतले, तर तुमच्या पद आणि उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते. समाजात तुमचा मान-सन्मानही वाढू शकतो. देश-विदेशांत तुम्हाला प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात; तसेच या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील. यावेळी तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky sjr
First published on: 31-03-2024 at 13:28 IST