मुंबई : सहल आयोजन क्षेत्रातील तंत्रसमर्थ मंच असलेल्या टीबीओ टेकची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. यासाठी कंपनीने ८७५ रुपये ते ९५० रुपये किंमतपट्टा निश्चित केला असून या माध्यमातून १,५५० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे.आयपीओच्या माध्यमातून ४०० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करण्यात येणार आहे. तर प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांकडील सुमारे १.२५ कोटी समभागांची विक्री करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान १६ समभाग आणि १६ समभागांच्या पटीत समभागांसाठी अर्ज करावा लागेल.

हेही वाचा >>> बजाजची सीएनजी दुचाकी १८ जूनला येणार

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tbo tek sets price band at rs 875 to 920 per share print eco news zws
First published on: 03-05-2024 at 21:50 IST