कोळसा मंत्रालयाने सप्टेंबर २०२३ या महिन्यात ६७.२१ दशलक्ष टन (MT) उत्पादन करून एकंदर कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढीची नोंद केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात झालेल्या ५८.०४ एमटी उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन १५.८१ टक्क्यांनी जास्त आहे. कोल इंडिया लिमिटेड(CIL) चे सप्टेंबर २०२३ मधील उत्पादन ५१.४४ एमटी आहे. गेल्या वर्षी याच महिन्यातील ४५.६७ एमटी उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन १२.६३ टक्क्यांनी जास्त आहे. २०२३-२४ या वर्षात सप्टेंबर २०२३ पर्यंतचे एकूण कोळसा उत्पादन भरीव वाढीसह ४२८.२५ एमटी झाले असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३८२.१६ एमटीच्या तुलनेत ते १२.०६ टक्क्यांनी जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः जागतिक बँकेकडून भारताला मोठा धक्का, महागाई वाढण्याचे दिले संकेत

त्याशिवाय कोळशाच्या चढ-उतारात सप्टेंबर २०२३ मध्ये उल्लेखनीय वाढ झाली असून, तिचे प्रमाण ७०.३३ एमटी आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ६१.१० एमटीच्या तुलनेत १५.१२ टक्के वाढीची नोंद झाली आहे. कोल इंडिया लिमिटेड(CIL) नेही या मध्ये उल्लेखनीय वाढीची नोंद केली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये हे प्रमाण ५५.०६ एमटी असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ४८.९१ एमटीच्या तुलनेत ते १२.५७ टक्क्यांनी जास्त आहे.

हेही वाचाः पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंचा २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार ई-लिलाव

उत्पादन, चढ-उतार आणि साठ्याच्या पातळीत उल्लेखनीय वाढ झाल्याने कोळसा क्षेत्रात अभूतपूर्व चढता कल दिसून येत आहे. या असामान्य प्रगतीमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या समर्पित कामगिरीमुळे ही अभूतपूर्व वृद्धी दिसून आली आहे. देशाचा सातत्याने होणारा विकास आणि भरभराट यामध्ये योगदान देणाऱ्या एका विश्वासार्ह आणि प्रतिरोधक्षम ऊर्जा क्षेत्रासाठी विनाखंड पुरवठा सुनिश्चित करून कोळशाचे उत्पादन आणि पाठवणी यामध्ये सातत्य राखण्यासाठी कोळसा मंत्रालय वचनबद्ध आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Total coal production was 67 21 million tonnes in september 2023 with a growth of 16 percent vrd