Money Mantra पारंपारिक गुंतवणूक पर्यायांचा आणि म्युच्युअल फंडाचा विचार केला तर दीर्घकालीन गुंतवणुकीवर उत्तम परतावा फक्त म्युच्युअल फंडातच मिळू शकतो. पारंपरिक पर्यायांमध्ये जोखीम (Risk) कमी असते त्याचप्रमाणे परतावे (Return) सुद्धा कमी असतात. या उलट बाजारातील चढ-उतारांचा योग्य फायदा घेऊन म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक मोठा ठोस निधी (कॉर्पस) तयार करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिटायरमेंट कॉर्पसचे महत्त्व ओळखा

निवृत्तीनंतर दर महिन्याला एक ठरलेली रक्कम आपल्याला मिळणे, ही आपली गरज असते व यासाठीच ४० ते ६० वर्ष या कालावधीत जसजसे जमतील तसतसे पैसे जमा करून ठेवायचे असतात व यातूनच रिटायरमेंट नंतरचे आयुष्य सुखी आणि समाधानी जगता येते. या जुन्या मॉडेलमध्ये एक धोका आहे तो म्हणजे व्याजाचे दर आणि महागाईचा दर यांचा संबंध न समजल्यामुळे पैसे पुरत नाहीत. महागाईच्या दरापेक्षा व्याजाचे दर कायमच कमी गतीने वाढतात, याचाच अर्थ तुम्ही रिटायरमेंट नंतर जे पैसे बाजूला ठेवलेले असतील त्यावरील व्याजाचा दर महागाईच्या दरापेक्षा कमी असेल तर हातात पडलेले पैसे तुम्हाला पुरणारच नाहीत.

हेही वाचा : दाव्याविना पडून असलेली ठेव रक्कम मिळवावी कशी?

यावर उपाय म्हणजे तुमचा कॉर्पस पुरेसा असायला हवा ज्यामुळे त्यावरील व्याज तुमच्यासाठी पुरेसे असेल.

रिटायरमेंट प्लानिंग मध्ये काय केले जाते ?

वर्षासन म्हणजेच Annuity पद्धतीने पैसे गुंतवले जातात व ज्याने पेन्शन पॉलिसी घेतली आहे त्याला ठरलेल्या व्याजदरानुसार पैसे दरमहा तीन महिन्यांनी किंवा वार्षिक मिळण्याची सुविधा असते. याउलट म्युच्युअल फंडात दोन -तीन फंडांत पैसे साठवून त्याचा एक निधी जमवला जातो, त्यातून दरमहा SWP माध्यमातून पैसे मिळायची सोय करता येते.

फंडाची कामगिरी चांगली असेल तर आपला निधी वाढतो, मात्र याची दुसरी बाजू अशी की, कॉर्पस तयार झाला आणि त्यातून पेन्शन प्लान विकत घेतला तर ज्या दराने पेन्शन प्लान विकत घेतला आहे तोच व्याजदर पुढील अनेक वर्षे कायम राहतो.

एसआयपी इतकीच एसडब्लूपी देखील महत्त्वाची

म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुमच्याकडे एक मोठी रक्कम तयार झाली तर त्याच रकमेवर आधारित सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान आपण दाखवू शकतो.

पुढील उदाहरणावरून हे लक्षात येईल

म्युच्युअल फंडात जमलेला निधी – एक कोटी
दरमहा SWP माध्यमातून मिळणारी रक्कम – पन्नास हजार रुपये
म्युच्युअल फंडाचा किती कॉर्पस वापरला गेला ? सहा लाख
म्युचुअल फंडाच्या पोर्टफोलिओचे अपेक्षित रिटर्न ८ % – आठ लाख

एखाद्या व्यक्तीकडे एक कोटी रुपयाचा रिटायरमेंट कॉर्पस तयार झाला आहे आणि त्याने दरमहा ५० हजार रुपये त्यातून काढून घेतले तर वर्षाकाठी सहा लाख रुपये त्याच्या कॉर्पस मधून कमी होतात. जर हा कॉर्पस म्युच्युअल फंडात गुंतवलेला असेल आणि त्यावर दर वर्षी आठ ते बारा टक्के एवढा परतावा मिळाला तर आपोआपच तुम्ही काढलेले पैसे पुन्हा त्या फंडात जमा होत राहतात.

हेही वाचा : वाढत्या वाहन उद्योगाचा लाभार्थी

एसडब्लूपी केव्हा अयशस्वी ठरेल?

तुम्ही गुंतवलेला म्युच्युअल फंडातील कॉर्पस आणि दर महिन्याला काढून घेतलेले पैसे याचे गणित जुळले नाही तर एसडब्लूपीचा फायदा होणार नाही. एखाद्याने पन्नास लाख रुपयांचा कॉर्पस जमवलेला असेल आणि तो दर महिना पन्नास हजार रुपये त्यातून काढून घेत असेल तर ते पैसे काही वर्षातच संपून जातील. एसडब्लूपी यशस्वी होण्यासाठी किमान पंधरा वर्षे एसआयपी करणे आवश्यक असते, एसआयपीमध्ये ज्या दराने पैसे वाढत असतील आणि त्यापेक्षा कमी पैसे जर काढून घेतले जात असतील तरच दीर्घकाळामध्ये याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा : कर समाधान : अनुमानित करासाठी वाढीव मर्यादा

म्युच्युअल फंडातील योजनेची जोखीम कशी ओळखायची ?

·इक्विटी फंड (लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप ) – सर्वाधिक जोखीम
·हायब्रीड फंड – मध्यम
·डेट फंड – कमी

गुंतवणूक करताना रिस्कोमीटर समजून घेतला तर फंडाची निवड सोपी होते

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करताना सर्व जोखीमविषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to use systematic withdrawal plan after retirement mmdc css