सध्या नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. त्या निमित्ताने करनियोजनही सुरू असेलच, अशा वेळेस सर्वोत्तम कर-बचत पर्याय असलेल्या काही लोकप्रिय आर्थिक विमा योजना आहेत ज्यांबद्दल करदात्यांना माहिती असली पाहिजे, त्याबाबत आज माहिती जाणून घेऊ. करदात्याची वैयक्तिक उद्दिष्टे, वय, जोखीम घेण्याची क्षमता आणि इतर घटकांवरही त्याचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. म्हणून, करबचतीसाठी विमा खरेदी करण्यापूर्वी, तुमचा निर्णय तुमच्या गरजांशी जुळला पाहिजे, हे तत्व सांभाळायला हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जसजशी आर्थिक वर्ष संपण्याची अंतिम मुदत जवळ येते, तसतसे बहुतेक लोकांना कर-बचत धोरणांचा सर्वोत्तम फायदा घेण्यासाठी शेवटच्या क्षणी त्यांचा आर्थिक पोर्टफोलिओ पुन्हा बदलायचा निर्णय घ्यावा लागतो. तथापि, करदाता त्याचे पैसे कशात घालत आहे हे पुरेशा संशोधनाशिवाय आणि समजून घेतल्याशिवाय शेवटच्या क्षणी फेरबदल केले जाऊ नयेत व झाल्यास कदाचित ते उपयोगाचे ठरू शकत नाहीत असा अनुभव आहे. म्हणूनच नियोजन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच असले पाहिजे.

हेही वाचा… पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

विमा हा तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा एक महत्त्वाचा भाग आहे हे सामान्य ज्ञान असताना, केवळ ‘कर बचत’ हा विम्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हेतू नसावा. कर-बचत गुंतवणूक योजनेसाठी फक्त निधी वाटप करणे हा योग्य दृष्टीकोन नाही. करदात्याने त्याची वैयक्तिक उद्दिष्टे, वय, जोखीम घेण्याची क्षमता आणि इतर घटकांवरही आर्थिक नियोजन अवलंबून असते हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच करबचतीसाठी विमा खरेदी करण्यापूर्वी, करदात्याने
त्याचा निर्णय त्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या गरजांशी जुळतोय ना याची काळजी घ्यावी. बाजारात काही लोकप्रिय आर्थिक विमा योजना आहेत ज्यांबद्दल करदात्याना माहीत असले पाहिजे आणि म्हणून कोणताही विमा घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे.

मुदतीचा जीवन विमा

कलम ८०सी अंतर्गत कर सवलत, मुदतीचा जीवन विमा (टर्म लाइफ इन्शुरन्स) हा बहुसंख्य करदात्यांसाठी कमी पैशात अधिक रक्कमेचा विमा मिळतो व कर सवलतही मिळते म्हणून हा त्यांच्या दृष्टीने उत्तम पर्याय असतो. मुदतीचा जीवन विमा हा आयुष्याची जोखीम घेणारा विम्याचा सर्वात उत्तम प्रकार आहे आणि पॉलिसीधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास विमाधारकास पॉलिसीमध्ये असलेल्या रक्कमे संदर्भात आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. व्यक्ती
व हिंदू कुटुंबपद्धती हे करदाते प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या मुदतीच्या जीवन विम्यासाठी भरलेल्या आयुर्विमा हप्त्यासाठी कर कपातीचा दावा करू शकतात.

हेही वाचा… वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?

करदात्याच्या कुटुंबाला विमा कर्त्याच्या मृत्युपश्चात उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांपासून वा येणाऱ्या आर्थिक ओझ्यापासून वाचवण्यासाठी हे सुरक्षिततेचे जाळे म्हणून काम करते. किंबहुना हे आर्थिक सुरक्षेचे कवच कुंडल प्रदान करते. ज्यावेळी करदाता विशेषत: एकमेव कमावता सदस्य असेल, तर या आयुर्विमा हप्त्याकडे केवळ कर-बचत दृष्टीकोनातून पाहणे अयोग्य आहे. वाढता खर्च, थकबाकी आणि चलनवाढीचा दर लक्षात घेऊन सद्य परिस्थितीत किमान एक कोटी रुपयांची किंवा अधिक जोखीम घेणे शहाणपणाचे पाऊल आहे. किंबहुना, अशा योजना आहेत ज्या कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय प्रीमियम परतावा देखील देतात ज्यामुळे मुदतीचा विमा अधिक मूल्य-चालित आणि किफायतशीर ठरतो.

या मुदतीच्या विमा योजना प्रकारात काही योजना अशाही आहेत की, विम्याच्या मुदत कालावधीत विमाकर्त्याचा मृत्यू झालेला नसेल तर मुदतपूर्ती नंतर सर्व विम्याचे हप्ते परत देण्याची देखील हमी दिली जाते. बोनस मात्र मिळत नाही. याचा अर्थ विम्याचे मान्य कवच कोणतेही पैसे खर्च न करता मिळू शकते अशा ही विमा योजना बाजारात आहेत. या संदर्भात काही विमा प्रतिनिधी विमाधारकास ३१ मार्चच्या आत पैसे दिल्यास एक दिवसासाठी पूर्ण
वर्षाची सदर रक्कमेची उत्पन्नातून वजावट मिळते असे भासवितात तथापि, त्यात थोडेफार तथ्य असले तरी विमा कालावधीच्या शेवटच्या वर्षात ३६४ दिवस अगोदर विमा हप्ता देऊन त्या वर्षात उत्पन्नातून वजावट मिळत नाही हे सांगत नाहीत, हे ही लक्षात घेतले पाहिजे.

आरोग्य विमा

वैद्यकीय खर्चात आलेल्या उच्च महागाईने त्रस्त असलेल्या जगात आरोग्य विम्याला आता नवा अर्थ प्राप्त झाला आहे. वैद्यकीय खर्चाचा घातांक दर संभाव्यपणे तुमची बचत संपवून टाकू शकतो आणि कुटुंबांना गरिबीत ढकलू शकतो इतकी त्याची संहारक शक्ती आहे. आरोग्य विम्यामध्ये आता हॉस्पिटलायझेशन व्यतिरिक्त अनेक खर्च समाविष्ट आहेत ज्याचा सतत विचार ने आवश्यक असते, जसे की डे-केअर प्रक्रिया, रुग्णवाहिका, ओपीडी, आयसीयू आदी. जे खर्च आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळवू शकतात. हे खर्च पुरेशा प्रमाणात भरण्यासाठी किमान पन्नास लाख ते एक कोटी रुपयांचे वि म्याचे कव्हरेज असावे.

हेही वाचा… गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू

स्वत:साठी, जोडीदारासाठी आणि मुलांसाठी आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमियम कलम ८०डी अंतर्गत रु. २५,००० पर्यंत उत्पन्नातून वजावटी साठी म्हणजेच कर कपातीसाठी पात्र आहे. करदाता त्याच्या पालकांसाठी भरलेल्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी भरलेल्या विम्याचा किंवा केलेल्या वैद्यकीय खर्चासाठी उत्पन्नातून वजावट घेऊन कर कपातीचा दावा देखील करू शकतो. करदात्याचे पालक ६० वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्यास, करदाता रु. २५,००० पर्यंतची वजावट उत्पन्नातून करून घेऊ शकतो व कर कपातीचा दावा करू शकतो तर पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास, कमाल ५०,००० रुपयांपर्यंतची वजावट एकंदरीत एकूण उत्पन्नातील वजावट ७५,००० रुपयांपर्यंत प्रभावीपणे घेऊन उत्पन्नातून करून घेऊ शकतो व कर कपातीचा दावा करू शकतो. हे सर्व पैसे रोख स्वरूपात देता येत नाहीत तर त्यासाठी बँकामार्फत सदर आर्थिक व्यवहार होणे गरजेचे आहे.

युनिट-लिंक्ड विमा योजना (ULIPs)

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान म्हणजेच ‘युलिप’ ही विमा कंपन्यांनी तयार केलेली ‘विमा व गुंतवणूक’ केंद्रित योजना आहे. व्यक्ती इक्विटी, डेट, बॅलन्स्ड फंड यांसारख्या विविध प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात जे बाजाराशी संबंधित आहेत. युनिट-लिंक्ड विमा योजनेच्या गुंतवणुकीच्या घटकाद्वारे बाजारातील परिस्थिती अनुकूल असल्यास १२-१५% परतावा मिळू शकतो. या फंडातील गुंतवणूक एखाद्या व्यक्तीची जोखीम भूक आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर अवलंबून असते. दुसरा घटक म्हणजे जीवन विमा जो तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या प्रियजनांना आर्थिक सुरक्षाजाळे प्रदान करतो. युलिप्स प्रीमियम पर्यायाची सूट देखील देतात ज्यामध्ये पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास विमाकर्ता पॉलिसीचा भविष्यातील प्रीमियम भरतो.

गुंतवणूकदारास गुंतवणूकीवरील परताव्या व्यतिरिक्त विम्याचे कवच देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे. गुंतवणूकदाराने दिलेल्या गुंतवणुकीच्या हप्त्याचा काही भाग विम्याचे कवच देण्यासाठी वापरला जातो तर उर्वरीत भाग विविध इक्विटी व डेट फंडामध्ये गुंतविला जातो. या योजनेतील विमा प्रामुख्याने गरजेच्या वेळी आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेला आहे, परंतु हा विमा गुंतवणूक घटक सामान्यत: इतर बाजार-चलित इतर
गुंतवणूक पर्यायांपेक्षा परताव्याच्या निकषावर नेहमीच कमी लोकप्रिय असल्याने पारंपारिक विमा संरक्षण योजना, आर्थिक जोखीम सुरक्षा जाळे प्रदान करताना, झालेल्या गुंतवणुकीवर भरीव उत्तम परतावा देण्यासाठी कुचकामी ठरत असतो, असा कायमचा अनुभव आहे. तथापि, जेव्हा वैयक्तिक निवडलेली गुंतवणूक योजना विम्याद्वारे संरक्षित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा, करदात्या व्यक्तींना आर्थिक विमा जोखीम संरक्षण आणि उच्च परताव्याच्या शोधात कोणत्यातरी एकाची निवड करण्याच्या अशा क्लिष्ट समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे जे गुंतवणूकदार उच्च परतावा आणि कर बचतीचा दुहेरी फायदा घेऊ इच्छितात अशा गुंतवणूक योजनाचा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी या योजनेतील घटकाद्वारे अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित केले गेले आहे.

हेही वाचा… समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (युलीप्स)

ही एक अशी आर्थिक गुंतवणूक योजना आहे जी या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी एक आकर्षक पर्याय म्हणून गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली आहे. युलिप विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचे घटक एकाच एकात्मिक योजनेत एकत्रित करून ही दरी भरून काढतात. याचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या प्रमाणे म्युच्युअल फंड विविध प्रकारची तंत्रे वापरून गुंतवणूक करतात तद्वत या विमा कंपन्या त्यांच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार डेट व इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणूकदाराने किमान तीन वर्षे डेट की इक्विटी मध्ये भाग घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा असतो किंबहुना तो नंतर बदलताही येऊ शकतो. योग्य बदलाची वेळ साधणारा गुंतवणुकदार उत्तम परतावा घेऊ शकतो हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. तथापि, डेट फंडात गुंतविलेल्या रक्कमेचा परतावा कमी असतो पण खात्रीशीर असतो, तर इक्विटी मध्ये गुंतविलेल्या रक्कमेचा परतावा काहीही असू शकतो हे गुंतवणूकदाराने लक्षात ठेवले पाहिजे.

कर सवलत हेही आकर्षण

युलिपचा विचार केल्यास कर सवलत हेदेखील एक आकर्षण आहे. प्राप्तिकर कायद्यानुसार, युलिप्ससाठी भरलेला हप्ता वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या कलम ८०सी अंतर्गत उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र आहे. याव्यतिरिक्त, युलिप्स मधून मिळणारी मुदतपूर्ती नंतरची रक्कम कलम १०(१०डी) अंतर्गत प्राप्तीकर कायद्याच्या २०२१ च्या दुरुस्तीच्या अधीन राहून कर आकारणीतून मुक्त आहे, जर वार्षिक प्रीमियम विमा रकमेच्या १०% पेक्षा जास्त नसेल. हा दुहेरी कर लाभ संपत्ती निर्मितीसह कर कार्यक्षमता शोधणाऱ्या व्यक्तींसाठी युलीप्स ला एक आकर्षक पर्याय ठरतो.

२०२१च्या अर्थ संकल्पानंतर योजनेत झालेले बदल

२०२१ च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांसाठी करमुक्त मिळणाऱ्या व्याजाच्या स्त्रोतावर मर्यादा आल्या आहेत. १ एप्रिल २०२१ पासून युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान (युलिप) या गुंतवणूक योजनांमध्ये मध्ये अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त होणाऱ्या गुंतवणुकीवर मिळालेल्या व्याजाच्या उत्पन्नावर प्राप्तिकर आकारला जात आहे. त्यापूर्वी भारतात लोकप्रिय असणाऱ्या या योजनेचे मिळणारे सर्व उत्पन्न कलम १०(१०डी) अतर्गत सध्या पूर्णतः करमुक्त होते. या
योजनेत मिळणारे उत्पन्न करमुक्त असावे यासाठी गुंतवणूकीचा गाभा जीवन विम्याशी निगडीत ठेवण्यासाठी कालावधी किमान दहा वर्षे निश्चित करण्यात आला होता तो आता बदलला आहे. याखेरीज आपत्कालीन व्यवस्थेसाठी पॉलिसीची अंमलबजावणी झाल्यानंतर पाच वर्षांनी प्री-मॅच्युरिटी करमुक्त रक्कम मिळू शकेल अशी तरतूद या योजनेत आहे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

हेही वाचा… ‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

गॅरेंटेड रिटर्न प्लान

आजच्या काळात जेव्हा बाजार अनिश्चित असतात, तेव्हा खात्रीशीर परतावा देणाऱ्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करणे खूप अर्थपूर्ण आहे. बाजारातील परिस्थिती विचारात न घेता, हमीपरताव्याच्या योजना तुमचे भांडवल सुरक्षित ठेवतात आणि खात्रीशीर परतावा देतात. या योजनांमध्ये, गुंतवणूकदाराला विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट रक्कम आगाऊ गुंतवावी लागते आणि परतावा हमखास असतो. नवीन काळातील योजना तुमच्या गुंतवणुकीवर ७-७.५% पर्यंत परतावा देतात. या योजना जीवन विमा घटकासह येतात ज्यामुळे ते कलम ८०सी आणि १० (१०डी) अंतर्गत कर लाभांसाठी पात्र ठरतात.

या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांच्या करपात्र उत्पन्नावरील कपातीचा दावा करून करदायित्व कमी करण्यात मदत होईल. तरीसुद्धा, वैशिष्ट्ये आणि फायदे तुमच्या वैयक्तिक उद्दिष्टांशी जुळतात की नाही याचे मूल्यांकन करणे अत्यावश्यक आहे. तथापी एक नियम लक्षात ठेवला पाहिजे की सर्वसाधारणपणे गुंतवणूक योजना कोणाच्या तरी आयुष्याशी निगडीत असल्या तरी येणारे उत्पन्न करमुक्त असणार आहे!

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Money mantra article about alternative options for insurance in tax saving investments mmdc asj
First published on: 09-04-2024 at 12:54 IST