सुहास पाटील
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील संवर्गातील एकूण २७४ पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC) ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार, दि. २८ एप्रिल २०२४ रोजी ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्याचे नियोजित होते. दि. ८ मे २०२४ च्या शुद्धिपत्रकानुसार सदर परीक्षा दि. ६ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल. संयुक्त पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या (एकूण ५२४ पदांच्या भरतीकरिता) उमेदवारांकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येतील. ( I) सामान्य प्रशासन विभाग – राज्य सेवा गट-अ व गट-ब – एकूण ४३१ पदे (मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(१) उप जिल्हाधिकारी, गट-अ – ७ पदे (अज – १, भज-ड – १, विमाप्र – १, सा.शै.मा. – १, आदुघ – १, खुला – २).

(२) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ – एकूण ११६ पदे (अजा – ९, अज – ६, विजा-अ – ३, भज-ब – २, भज-क – ४, भज-ड – २, इमाव – २७, विमाप्र – २, सा.शै.मा. – १२, आदुघ – १२, खुला – ३७) (५ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV – २, D/ HH – १, CP/ LC/ DW – १, Autism/ MI – १ पद राखीव) (अनाथ – १ पद राखीव).

(३) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ – ५२ पदे (अजा – ७, अज – ५, विजा-अ – २, भज-ब – १, भज-क – १, भज-ड – १, इमाव – ११, विमाप्र – १, आदुघ – ५, सा.शै.मा. – ५, खुला – १३) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV – १, CP/ LC/ DW – १ साठी राखीव).

(४) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (कनिष्ठ) – ४३ पदे (अजा – ९, अज – ३, विजा-अ – ३, भज-ब – १, भज-क – ३, इमाव – 1०, विमाप्र – १, सा.शै.मा. – ४, आदुघ – ४, खुला – ५) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV – १, D/ HH – १ साठी राखीव).

(५) सहायक आयुक्त /प्रकल्प (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) श्रेणी-२, गट-अ – ३ पदे (अज – १, भज-ब – १, खुला – १).

(६) उद्याोग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ – ७ पदे (अजा – २, इमाव – २, सा.शै.मा. – १, आदुघ – २).

(७) सहायक कामगार आयुक्त, गट-अ – २ पदे (इमाव – १, आदुघ – १).

(८) सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्याोजकता, गट-अ – १ पद (खुला).

(९) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब – १९ पदे (अजा – ४, अज – २, विजा-अ – १, भज-ड – १, इमाव – ४, सा.शै.मा. – २, आदुघ – २, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी B/ LV साठी राखीव).

(१०) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब – २५ पदे (अजा – ४, अज – १, विजा-अ – १, इमाव – ९, विमाप्र – २, सा.शै.मा. – ३, आदुघ – २, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी CP/ LV, DW साठी राखीव).

(११) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – १ पद (खुला).

(१२) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब – ५ पदे (विजा-अ – १, इमाव – २, सा.शै.मा. – १, आदुघ – १).

(१३) कौशल्य विकास, रोजगार व उद्याोजकता मार्गदर्शन अधिकारी, गट-ब – ७ पदे (इमाव – २, सा.शै.मा. – १, आदुघ – १, खुला – ३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी CP, LC, DW साठी राखीव).

(१४) सरकारी कामगार अधिकारी, गट-ब – ४ पदे (अजा – १, अज – १, आदुघ – २).

(१५) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी /संशोधन अधिकारी /गृहप्रमुख/प्रबंधक, गट-ब – ४ पदे (अज – १, भज-ब – १, भज-क – १, आदुघ – १).

(१६) उद्याोग अधिकारी (तांत्रिक), गट-ब – ७ पदे (विजा-अ – १, सा.शै.मा. – १, आदुघ – १, खुला – ४) (१ पद दिव्यांग कॅटेगरी B/ LV साठी राखीव).

(१७) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब – ५२ पदे (अजा – ७, अज – ४, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – २, भज-ड – १, इमाव – १०, सा.शै.मा. – ५, आदुघ – ५, खुला – १५) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV व D/ HH साठी प्रत्येकी १ पद राखीव)

(१८) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब – ७६ पदे (अजा – १०, अज – ५, विजा-अ – २, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – २, इमाव – १४, विमाप्र – २, सा.शै.मा. – ८, आदुघ – ८, खुला – २०) (३ पदे दिव्यांग कॅटेगरी B/ LV, D/ HH, CP/ LC/ DW साठी प्रत्येकी १ पद राखीव).

उर्वरित भाग पुढील अंकात

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity opportunities in maharashtra govt amy