Premium

PAK vs AUS: पाकिस्तानी खेळाडू ट्रकमध्ये सामान चढवतानाचा VIDEO व्हायरल, चाहत्यांनी दोन्ही देशांच्या व्यवस्थापनाला फटकारले

Pakistan players Video Viral: पाकिस्तानी खेळाडू शुक्रवारी कॅनबेरा विमानतळावर उतरले. यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

of Pakistan players loading their luggage into the truck video viral
पाकिस्तान क्रिकेट टीम (फोटो-एक्स)

Pakistan players loading their luggage into the truck video viral : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. पाकिस्तानी खेळाडू शुक्रवारी कॅनबेरा विमानतळावर उतरले. यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुपान व्हायरल होत आहे. वास्तविक, विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंना त्यांचे सामान स्वतःच ट्रकमध्ये चढवावे लागले. यावेळी ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनातील कोणतेही कर्मचारी पाकिस्तानी खेळाडूंना मदत करताना दिसले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये मोहम्मद रिझवान ट्रकमध्ये उभा असलेला दिसत आहे. तो सर्व खेळाडूंचे सामान घेवूनन व्यवस्थित लावताना दिसतोय. बाकीचे खेळाडू आपले सामान उचलून ट्रकमध्ये चढवताना दिसत होते. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकारच्या आदरातिथ्यामुळे चाहते चांगले संतापले असून ऑस्ट्रेलियाला ट्रोल करत आहेत.

एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, ‘यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सामान उचलण्याची व्यवस्था नाही? पाकिस्तानी खेळाडू स्वतःहून सामान चढवण्यात व्यस्त आहेत, हे किती विचित्र आहे. जर हे पाकिस्तानमध्ये घडले असते तर संपूर्ण जगाने बातम्यांमध्ये त्याचा उल्लेख केला असता.’

आणखी एका युजरने लिहिले, ‘भाई, पाकिस्तानी खेळाडूंचे सामान ट्रकमध्ये भरणारा अधिकारी कर्मचारी नाही का!! हे दयनीय आहे!! ऑस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून हे अपेक्षित नव्हते! हीच का स्वागत करण्याची पद्धत?’

याआधी शुक्रवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कामरान अकमल, राव इफ्तिखार अंजुम आणि सलमान बट्ट यांना निवड समितीचे सदस्य बनवले होते. त्याचबरोबर माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझला मुख्य निवडकर्ता बनवण्यात आले आहे. विश्वचषक २०२३ मध्ये खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचे संपूर्ण व्यवस्थापनच बदलले. सर्व माजी प्रशिक्षकांना काढून टाकण्यात आले आहे. मोहम्मद हाफिजची संघ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली , तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. पाकिस्तान संघाला विश्वचषकात नऊपैकी केवळ पाचच सामने जिंकता आले होते.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After landing at canberra airport the video of pakistan players loading their luggage into the truck has gone viral vbm

First published on: 02-12-2023 at 17:02 IST
Next Story
IPL 2023 : ‘स्वीट मँगो’ स्टोरीबद्दल नवीन उल हकचा मोठा खुलासा, सांगितले विराट कोहलीशी काय होता संबंध?