भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना निवडणुकीआधीच ‘बाद’ करून बिनविरोध विजयी झालेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) नवनिर्वाचित अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पदभार घेतल्या घेतल्याच मुलुंड आणि कल्याण-डोंबिवली येथे क्रिकेट अकादमी उभारण्याची घोषणा केली.
डोंबिवली परिसरात लोढा ग्रुपने १ रुपया या दराने ९९ वर्षांसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये किमतीची १३ एकर जमीन भाडेतत्वावर उपलब्ध करून दिली आहे. मुलुंड-भांडुप परिसरातही अशा अकादमीसाठी जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
बीसीसीआयमध्ये जाणार नाही
एमसीएच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पवार पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करतील, अशी चर्चा होती. मात्र, आपल्याला आता पुरेसा वेळ मिळत नसल्याने आपण बीसीसीआयमध्ये जाणार नाही, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket academy soon started in mulund dombivli sharad pawar
Show comments