Premium

IND vs SL: श्रीलंका संघाने रचला इतिहास! भारताविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

IND vs SL Match Updates: श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी कोलंबोतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातही सर्व १० विकेट्स घेतल्या होत्या. २००१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ही आश्चर्यकारक गोष्ट घडली होती.

spinners take all wickets against India
श्रीलंकेचा संघ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sri Lankan spinners created history by taking all 10 wickets: आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीतील चौथ्या सामन्यात भारताविरुद्ध श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली. टीम इंडिया ५० षटकेही खेळू शकली नाही आणि दुनिथ वेल्लालगे, चरिथ असलंका आणि महेश तिक्षिना यांच्यामुळे २१३ धावांवर ऑलआऊट झाली. वेल्लालगे ५, अस्लंकाने ४ आणि तिक्शिनाने १ बळी घेतला. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी दुसऱ्यांदा वनडे सामन्यात सर्व १० विकेट घेतल्या. एकदिवसीय सामन्यात फिरकीपटूंनी सर्व विकेट घेण्याची ही दहावी वेळ होती. भारताविरुद्ध कोणत्याही संघाने अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेने प्रतिस्पर्ध्यी संघाला सर्वबाद करण्याची ही सलग १४वी वेळ आहे. उल्लेखनीय म्हणजे, माजी विश्वविजेते संघाने खेळाच्या ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये मागील सलग १३ सामने जिंकले आहे. त्याचबरोबर या १३ सामन्यातं विरोधी संघाना सर्वबाद करुन विजय नोंदवले आहेत.श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी यापूर्वी वनडे सामन्यात सर्व १० विकेट्स कधी घेतल्या होत्या? श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी २२ वर्षांपूर्वी असा पराक्रम केला होता. २००१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हे घडले होते. तो सामना कोलंबोतच झाला होता. हा सामना १२ डिसेंबर २००१ रोजी झाला. श्रीलंकेच्या संघाने हा सामना ५९ धावांनी जिंकला होता.

झिम्बाब्वेचा संघ ४७.२ षटकांत २१३ धावांवर झाला होता गारद –

श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिरंगी मालिकेतील हा चौथा सामना होता. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत ७ गडी गमावून २७२ धावा केल्या. महेला जयवर्धनेने १०८ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या. अविष्का गुणवर्धनेने ९० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ ४७.२ षटकांत सर्वबाद २१३ धावांवर आटोपला.

हेही वाचा – IND vs SL: रोहित शर्माने मोडला शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केला ‘हा’ खास कारनामा

मुथय्या मुरलीधरनने घेतल्या होत्या ४ विकेट्स –

श्रीलंकेकडून मुथय्या मुरलीधरनने १० षटकांत ३२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय उपुल चंदना आणि रसेल अरनॉल्डने २-२ विकेट्स घेतल्या होत्या. कुमार धर्मसेनाने एक विकेट घेतली होती. तो धर्मसेना आता पंच आहेत. तो आयसीसी एलिट पॅनेलचा पंच आहे. झिम्बाब्वेकडून ग्रँट फ्लॉवरने सर्वाधिक ४५ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sri lankan spinners created history by taking all 10 wickets against the indian team in odis vbm

First published on: 12-09-2023 at 21:49 IST
Next Story
IND vs SL: एका मिनिटासाठी भारतीय चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला, जसप्रीत बुमराहबाबत असं काही घडलं की; पाहा Video