South Africa Cricket Team: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार आहे. यासाठी टीम इंडियाचा टी-२० संघही आफ्रिकेत पोहोचला आहे. बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी-२० आणि वन डे मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षी २०२४ मध्ये टी-२० विश्वचषकही खेळवला जाणार आहे. दरम्यान, आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फाफ डुप्लेसिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत अपडेट दिले आहे. त्याच्या पुनरागमनाबद्दल त्यांनी काय सांगितले ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ डु प्लेसिसने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, त्यानंतरही तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसत आहे. सध्या त्याच्याकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधारपद आहे. आता फक्त काही महिने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ला उरले आहेत. आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसने पुनरागमनाचे संकेत दिले असून आफ्रिकन संघासाठी ही एक मोठी घडामोड आहे.

हेही वाचा: Ajay Jadeja: अजय जडेजाने पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्याबाबत केले सूचक विधान; म्हणाला,“मी तयार…”

फाफ डू प्लेसिसने केला खुलासा

फाफ डु प्लेसिसने एका मुलाखतीत सांगितले की, “मला खात्री आहे की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेन. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून याबद्दल बोलत आहोत. मी पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ साठी फलंदाजीतील समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहे. मी संघाच्या नवीन प्रशिक्षकाबरोबर पुनरागमन करण्याबाबतही बोललो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. मी माझ्या फिटनेसवर काम करत आहे जेणेकरून मला चांगले क्रिकेट खेळता येईल.”

तो पुढे म्हणाला, “तुमचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे तुम्हाला तुमच्या फिटनेसवर अधिक मेहनत करावी लागते. वाढत्या वयामुळे हॅमस्ट्रिंग आणि शरीराचे इतर अवयव देखील काम करू शकत नाहीत. अशा स्थितीत तंदुरुस्त राहण्यासाठी एक उत्तम गोष्ट आहे. शारीरिक संतुलन राखणे आवश्यक आहे.” डु प्लेसिसने केवळ कसोटीतूनच निवृत्ती घेतली आहे. २०१९ मध्ये तो शेवटचा टी-२० क्रिकेट खेळला होता. मात्र, तेव्हापासून तो केवळ परदेशी आणि देशांतर्गत लीग खेळला आहे आणि तिथे त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

हेही वाचा: IND-W vs ENG-W: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया इंग्लंडला धोबीपछाड देणार का? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

गेल्या दोन आयपीएल हंगामात फॅफने अप्रतिम कामगिरी केली

आयपीएलच्या गेल्या दोन मोसमात, फॅफ डू प्लेसिसने कर्णधार म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गेल्या दोन हंगामात फॅफच्या बॅटमधून ११९८ धावा झाल्या आहेत. जर आपण २०२३च्या हंगामाबद्दल बोललो तर त्याने १४ सामन्यांमध्ये ७३० धावा केल्या, ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून डु प्लेसिसची आकडेवारी पाहिली तर त्याने ४० पैकी २५ सामने जिंकले तर १५ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran player faf du plessis may return before the t20 world cup himself revealed avw