Kitchen Jugaad: निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर आपल्याला नेहमी भाज्या, कडधान्यांसह फळांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. कारण आरोग्यासाठी फळांचे सेवन करणेही आवश्यक असते. प्रत्येक फळामध्ये काही ना काही खास गुणधर्म असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात. सहसा लोक पेरु, चिक्कू, द्राक्ष संफरचंद अशी खातात पण. मात्र, डाळींब, संत्री अशी फळे खात नाही. यात डाळींब सोलणं हे एकप्रकारचं दिव्यच असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाळींब हे फळ खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहे. डाळींबामध्ये अनेक पोषक घटक आहेत. डाळींब खाण्यामुळे चेहऱ्यावरील तेज वाढते, अपचन, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यसाठी डाळींब खाणे फायदेशीर ठरते. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये लोक डाळींब खाण्याचा फार कंटाळा करतात कारण डाळींब सोलणे फार अवघड आहे. डाळींब सोलायचे मग त्यातील दाणे काढायची फार वेळ खाऊ काम आहे. पण डाळींब सोलण्यासाठी एक भन्नाट ट्रिक वापरली तर तुमचा वेळही वाचू शकतो आणि डाळींब झटपट सोलताही येईल.

डाळींब सोलण्याची सोपी ट्रिक

  • १) सर्वप्रथम डाळीं स्वच्छ धूवून घ्या आणि त्याचे तोंडाचा भाग चाकून कापा.
  • २) त्यानंतर पांढऱ्या रेषा दिसतात त्यावरून चारी बाजूने वरच्या वर कापून घ्या करून घ्या.
  • ३)त्यानंतर चारही कार हाताने वेगळे करा, पूर्ण तोडून टाकू नका.
  • ४)डाळींब उलटे करून हातावर पकडा. ते एका ताटलीवर पकडून सालीवर एका चमच्याने मारा
  • ५) सर्व दाणे १ मिनिटांमध्ये ताटलीमध्ये टाका

हेही वाचा – कुकरच्या शिट्टीमध्ये ४ थेंब तेल टाकून पाहा काय होईल कमाल!

हेही वाचा – ऑम्लेट की इडली; मधुमेही व्यक्तींसाठी सर्वोत्तम नाश्ता कोणता? जाणून घ्या डॉक्टरांकडून…


डाळींबाचे दाणे सोलून फ्रिजमध्ये ठेवू शकता किंवा ऑफिसला जाताना डब्यामध्ये घेऊ जाऊ शकता. सॅलडमध्ये देखील टाकून तुम्ही खाऊ शकता.
ही भन्नाट ट्रिक Sunita Agarwal या युट्यूब चॅनेलवर शेअर केली आहे. ही ट्रिक खरच उपयूक्त आहे की नाही हे स्वत: वापरून पाहा,

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing trick to peel pomegranate in 1 minute useing spoon video is going viral snk
First published on: 01-02-2024 at 20:46 IST