kitchen Jugaad Video: औषधांच्या गोळ्या एक्सपायर झाल्या की, त्या आपण फेकून देतो. एक्सपायर झालेली औषधे खाऊ नयेत, यात शंका नाही. पण तुम्हाला एक्सपायर औषधंही आपल्यासाठी खूप कामाची आहेत, माहिती आहे का, जर तुम्हाला एक्सपायर औषधांचे असे जबरदस्त उपयोग माहित नसतील, तर एका गृहिनीने सोशल मिडियावर दाखवलेला जुगाड नक्की पाहा. औषधाच्या एक्सपायर गोळ्या आता तुमच्याकडे पडलेल्या असतील आणि त्या फेकून देण्याचा विचार असेल किंवा त्याचं काय करायचं, असा प्रश्न असेल तर तुम्ही त्या स्वयंपाकघरातील कामासाठी वापरू शकता. आता स्वयंपाकघरात औषधाच्या एक्सपायर गोळ्यांचा काय फायदा आहे, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. चला तर मग व्हिडीओमध्ये काय दाखवलं आहे, जाणून घेऊयात…

डाग कुठेच चांगले नाही दिसत. कपड्यावर असो अथवा किचनच्या टाईल्सवर. दिसायला हे खूपच घाण दिसते. पदार्थांना फोडणी देताना आणि इतरही अनेक कारणांनी किचन ओट्याच्या मागील टाईल्स खराब होतात. एकदा त्या खराब व्हायला लागल्या की वेळच्या वेळी साफ केल्या नाहीत तर हा थर साठत जातो आणि रोजच्या रोज हे साफ केले नाही तर नंतर हे डाग काही केल्या निघत नाहीत. पण असे होऊ नये, म्हणून सोप्या पद्धतीने हे डाग कसे घालवायचे, याविषयी एका महिलेने जुगाड दाखविला आहे.

(हे ही वाचा : Jugaad Video: बटाटा सिलिंडरला एकदा घासून पाहा; ‘या’ मोठ्या समस्येतून होईल सुटका )

व्हिडीओत तुम्ही पाहाल तर, गृहिणीने एक प्लाॅस्टिकचा कंटेनर घेतला आहे. यामध्ये महिलेने हार्पिक टाकलं आहे. त्यानंतर महिलेने यात एक चमचा व्हिनेगर टाकलं आहे. त्यानंतर यात एक्सपायर झालेली औषधाची गोळी टाकली आहे आणि हे विरघळेपर्यंत मिक्स केलं आहे. मग त्यात एक चमचा डिटर्जंट पावडर टाकलं आहे आणि सर्व मिश्रण मिक्स करुन घेतलं आहे. स्टीलचा चमचा यासाठी वापरु नका. मिश्रण मिक्स करण्यासाठी एक यूझ अँड थ्रो चमचा वापरा आणि नंतर फेकून द्या, असंही महिलेने सांगितले. मग हे मिश्रण एका बाटलीत टाका. यानंतर हे मिश्रण किचन ओट्याच्या मागील टाईल्सवर टाकून स्क्रबच्या मदतीने स्वच्छ करा आणि डाग निघाल्यावर ओल्या कापडाने पुसून घ्या. यामुळे किचन टाईल्‍सचे हट्टी डाग निघून टाईल्‍स नव्या सारख्या चमकतील, असा दावा महिलेने केला आहे.

येथे पाहा व्हिडिओ

Amy’s Trendy Tips या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)