Parenting Tips: मुलांवर केलेले संस्कार त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचे काम करते. आई-वडीलांच्या सवयी कशा आहे आणि कशाप्रकारे ते मुलांवर संस्कार करतात याचा प्रभाव मुलांवर पडतो. पण कित्येकदा मुलं खोटं बोलतात, मुलं आपले प्रत्येक कामासाठी नकार देतात आणि मुलं प्रत्येक गोष्टी वाद घालू लागतता. यासाठी मुलांवर संस्कार करताना पालकांच्या चुका कारणीभूत ठरतात. आई-वडीलांच्या कोणत्या अशा चुका आहे ज्यामुळे मुलांवर चुकीचे संस्कार होऊ शकतात किंवा मुलांना चुकीच्या सवयी लागू शकतात, ते जाणून घ्या.

मुलांच्या समोर खोटे बोलणे

वारंवार ही गमंत किंवा मस्करी करण्यासाठी किंवा मग कोणाची भांडणे होऊ नये यासाठी आई-वडील मुलांसमोर खोट बोलू लागतात. आई-वडील स्वतःच खोटं बोलतात हे पाहून मुलांनाही ती सवय लागते. सुरुवातीला ते लहान गोष्टींमध्ये खोटं बोलतात आणि त्यांचा खोटेपणा वाढत जातो.

मुलांची भावनिक वाढ न होऊ देणे

अनेकदा आई-वडील मुलांना सांगतात की, रडू नो किंवा कधी सारखं हसू नको किंवा वाईट वाटल्यानंतर राग व्यक्त का करतोय अशा गोष्टी बोलतात.त्यामुळे मुलांना वाईट वाटते आणि त्यांना दुखः होते. मुलांना त्यांच्या भावना कळत नाही आणि आई-वडील त्यांची भावनिक वाढ व्यवस्थित होऊ देत नाही अशा स्थितीमध्ये मुलं असंवेदनशील होऊ शकतात किंवा अति संवेदनशील होऊ शकतात.

हेही वाचा – बाजारात मिळणाऱ्या ब्रेड्सपैकी कोणते ब्रेड्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येईल? तज्ज्ञांचा सल्ला वाचा

मुलांचे सर्व निर्णय स्वत:च घेऊ द्या

मुले मोठे होतात तेव्हा पालक तक्रार करतात की ते स्वत:चे निर्णय स्वत: का घेत नाही किंवा मुलं प्रत्येक गोष्ट करताना घाबरतात का? याचे कारण असू शकते की, पालक मुलांना लहानपणापासूनच कोणते निर्णय घेऊ देत नाही. जर असे झाले तर मुले काही करण्याआधी शंभरवेळा विचार करतात आणि कोणतेही काम करताना भिती वाटते. त्यामुळे मुलांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य निर्माण होत नाही.

हेही वाचा – ग्लुटेनयुक्त आहार टाळल्यास गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी होईल का? काय आहे तज्ज्ञांचे मत…

मुलांच्या समोर वाद घालणे


पालकांना असे वाटते मुलांसमोर थोडी -फार भांडणे केली तर त्यात काही वाईट नाही पण मुले याच भांडणातून खूप काही शिकतात. मुले पालकांसह वाद घालतात आणि त्यांना अशा भांडण करण्याबाबत काहीच चुकीचे वाटत नाही कारण आई- वडील एकेमकांबरोबर वाद घालत असतात.