पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने महिनाभरापूर्वी तिसरं लग्न केलं. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर सानिया व शोएब यांचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. भारतीय माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएबपासून घटस्फोट घेतला आणि नंतर शोएबने तिसरं लग्न केलं.

सना जावेद ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. शोएबने लग्नाचे फोटो शेअर करताच तिने तिचं इन्स्टाग्रामवरील नाव बदलून सना शोएब मलिक असं ठेवलं होतं. आता नुकतीच ती पाकिस्तान सुपर लीगचा सामना पाहायला गेली होती होती, त्यावेळी ती स्टेडिअममध्ये चालत जात असताना प्रेक्षकांना जोरजोरात सानिया मिर्झा म्हणत चिडवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सानिया मिर्झाचा संसार मोडला, शोएब मलिकने शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे त्याची तिसरी पत्नी सना जावेद?

प्रेक्षक सानिया मिर्झा असं म्हणत तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात. तेव्हा ती त्यांच्याकडे बघते आणि पुढे निघून जाते, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ने शेअर केलेल्या व्हिडीओवर ‘काम असं करा की पूर्ण पाकिस्तान शिव्या घालेल’, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

शोएब मलिकशी दुसरं लग्न केल्यावर सना जावेदची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “सानिया मिर्झासाठी…”

‘ही पहिली व्यक्ती आहे जिचा भारतीय आणि पाकिस्तानी एकत्र अपमान करत आहेत,’ ‘भारत-पाकिस्तान पहिल्यांदाच एका टीममध्ये’, ‘सना म्हणत असेल मी कुठे येऊन अडकले’, अशा कमेंट्स लोक करत आहेत.

सना जावेदच्या व्हिडीओवरील कमेंट्स

दरम्यान, सना जावेद व शोएब मलिक यांनी २० जानेवारी रोजी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यापूर्वी सानिया व शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या पण दोघांनीही त्याबाबत अधिकृत भाष्य केलं नव्हतं. पण शोएबच्या लग्नानंतर त्याचा व सानियाचा घटस्फोट झाल्याचं स्पष्ट झालं.