अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून होत आहे. गेल्या महिन्यात ऐश्वर्या रायचा वाढदिवस होता, त्यादिवशी ती तिच्या आई व मुलीबरोबर दिसली होती. तिने वाढदिवसाचा केक कापला पण तिथेही बच्चन कुटुंबीय नव्हते. त्यापूर्वी पॅरिस फॅशन वीकमध्ये तिने हजेरी लावली. तिथे तिच्या सासूबाई जया बच्चन, नणंद श्वेता बच्चन व तिची लेक नव्या होते. श्वेताने शेअर केलेल्या फोटोंमध्येही ऐश्वर्या नव्हती, त्यामुळे अभिषेक व ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेकने पोस्ट केली होती. पण सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यातील दुराव्याबद्दल चर्चा आहेत. अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू असतानाच तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्याबरोबर अभिषेकदेखील होता. यात ती अभिषेकबरोबर रोज भांडणं होतात, असं म्हणताना दिसते. २०१० मध्ये ‘वोग इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या राय बच्चनने याबद्दल खुलासा केला होता. ‘आमची रोज भांडणं होतात’, असं ती म्हणाली होती. मात्र, त्याला भांडण म्हणण्याऐवजी अभिषेकने ‘मतभेद’ म्हटलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

“पण ती भांडणं नसून मतभेद आहेत. ती भांडणं गंभीर नाहीत, ती हेल्दी आहेत. असे मतभेद राहिले नाहीतर आयुष्य खूप कंटाळवाणं होईल,” असं अभिषेकने म्हटलं होतं. यानंतर अभिषेकने मतभेद कसे दूर करतो हे सांगितलं होतं. अभिषेक म्हणाला होता की तो भांडण झाल्यावर माफी मागतो आणि भांडून कधीच झोपत नाही. “महिला सर्वोत उत्तम आहेत आणि त्या नेहमीच बरोबर असतात. पुरुष हे जितक्या लवकर स्वीकारतील तितकं चांगलं होईल,” असं अभिषेक म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When aishwarya rai revealed she and abhishek bachchan fight every day hrc
First published on: 05-12-2023 at 13:32 IST