कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या बहुचर्चित ‘रिआलिटी गेम शो’च्या सुत्रसंचलनाला बॉलीवूड दबंग खान सलमान पूर्णविराम देणार आहे. सलमान गेल्या मोसमापासून ‘बिग बॉस’चे सुत्रसंचलन आतापर्यंत अतिशय खुबीने वठवत आला आहे. यावेळी देखील सलमानने ‘बिग बॉस’चे सुत्रसंचलन चोखपणे बजावले. यंदाच्या ‘बिग बॉस’चा कालावधी एका महिन्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र, सलमानच्या सुत्रसंचलनाचा करार ४ जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. आणि सलमाननेही आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी पुढील तारखा निश्चित केल्यामुळे करार वाढविण्यास त्यानेही नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित महिन्याभरासाठी ‘बिग बॉस’चे सुत्रसंचलनसाठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
‘बिग बॉस’ला मिळणारा प्रतिसाद पाहता. या कार्यक्रमाचा कालावधी आणखी एका महिन्याने वाढविण्यात आला. पण, सलमानला त्याचा आगामी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या चित्रीकरणसाठी राजस्थानला जावे लागणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’साठी त्याला वेळ देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ‘बजरंगी भाईजान’ सोबत सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्याही तारखा निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’ निर्मात्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan replaces salman as host of bigg boss
Show comments